...तर मोदींना डिसेंबर अखेर पायउतार व्हावे लागेल : पृथ्वीराज चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

'राफेल' खरेदीचा इतिहासाच पहिल्यांदाचा मोठा घोटाळा झाला आहे. विमानाच्या खरेदी व्यवहाराची माहिती मोदी सरकार देत नाही. या प्रकरणात सीबीआयकडे तक्रार झाल्यानंतर सीबीआयला आठ दिवसात गुन्हे नोंदवावे लागतात. तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकणात गुन्हा दाखल करायची शक्यता वाटू लागल्यानंतर मोदी सरकराने सीबीआयच्या अधिकाऱ्यांची रात्रीत तडकाफडकी बदली केली. लवकरच यातील वस्तुस्थितीत समोर येईल. या प्रकरणी सीबीआय आणि न्यायपालिका ठाम राहिल्यास पंतप्रधान मोदींना डिसेंबरअखेर पायउतार व्हावे लागेल.''

कऱ्हाड : '' 'राफेल' खरेदीचा देशाच्या इतिहासात पहिल्यांदाचा मोठा घोटाळा झाला आहे. विमानाच्या खरेदी व्यवहाराची माहिती मोदी सरकार देत नाही. या प्रकरणात सीबीआयकडे तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाटू लागल्यानंतर मोदी सरकराने सीबीआयच्या अधिकाऱ्यांची रात्रीत तडकाफडकी बदली केली. हा खरेदी व्यवहार पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच्या अखत्यारीत व कोणालाही विश्वासात न घेता केला आहे. येत्या काही दिवसात यातील वस्तुस्थितीत समोर येईल. याप्रकरणी सीबीआय आणि न्यायपालिका ठाम राहिल्यास पंतप्रधान मोदींना डिसेंबरअखेर पायउतार व्हावे लागेल.'' , असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या संवाद या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

मेळाव्याचे संयोजक व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, प्रदेश कॉंग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल,  पत्रकार मधुकर भावे, शिबीराचे समन्वयक रामहरी रुपनवर, सरचिटणीस यशवंत हप्पे यांच्यासह मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, '' 'राफेल' खरेदीचा इतिहासाच पहिल्यांदाचा मोठा घोटाळा झाला आहे. विमानाच्या खरेदी व्यवहाराची माहिती मोदी सरकार देत नाही. या प्रकरणात सीबीआयकडे तक्रार झाल्यानंतर सीबीआयला आठ दिवसात गुन्हे नोंदवावे लागतात. तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकणात गुन्हा दाखल करायची शक्यता वाटू लागल्यानंतर मोदी सरकराने सीबीआयच्या अधिकाऱ्यांची रात्रीत तडकाफडकी बदली केली. लवकरच यातील वस्तुस्थितीत समोर येईल. या प्रकरणी सीबीआय आणि न्यायपालिका ठाम राहिल्यास पंतप्रधान मोदींना डिसेंबरअखेर पायउतार व्हावे लागेल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: then Modi will have to step down by December said Prithviraj Chavan