...तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडणार : प्रकाश चवरे

चंद्रकांत देवकते
शनिवार, 21 जुलै 2018

उजनी लाभधारक क्षेत्रात पाऊस झाल्याने उजनी धरणातून बोगद्याद्वारे सीना नदीमधून २००  क्यूसेसने पाणी सोडण्यास चालू आहे. परंतु याचा फायदा फक्त माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनाच होणार आहे.

मोहोळ : तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकांना पाणी कमी पडत असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तरी उजनी धरणातून शेतीसाठी सीना नदीद्वारे पाणी सोडावे, अन्यथा माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मोहोळ तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी दिला.

उजनी लाभधारक क्षेत्रात पाऊस झाल्याने उजनी धरणातून बोगद्याद्वारे सीना नदीमधून २००  क्यूसेसने पाणी सोडण्यास चालू आहे. परंतु याचा फायदा फक्त माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनाच होणार आहे. नदीत पाणी सोडणेबाबत असा कोणताही दुजाभाव न करता नदीत सोडलेल्या पाण्यामध्ये वाढ करावी आणि लालफितीने आपल्या अधिकारात दुटप्पीपणा न करता तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांना जीवनदान द्यावे. अन्यथा  तालुक्यातील शेतकऱ्यावर होणारा अन्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही खपवून घेणार नाही. या मागणीची संबंधित विभागाने तत्काळ दखल नाही घेतल्यास माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी दिली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नागेश साठे, रणजित देशमुख, जगन्नाथ कोल्हाळ, शशिकांत पाटील, राहुल मोरे, धनाजी गावडे, पंडित ढवन, गणेश जगताप, रवींद्र देशमुख, प्रदीप साठे, रामराजे कदम, शशिकांत कोल्हाळ, बालाजी साठे, मकू हावळे, सागर राजेपांढरे, संभाजी चव्हाण, संतोष चव्हाण, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
 

Web Title: then NCP will go on Agitation says Prakash Chavare