तर शिवसेनेशिवाय लोकसभा निवडणुकीला सामोरे जावु - रावसाहेब दानवे

हेमंत पवार 
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कऱ्हाड - भाजप-शिवसेनेने मागच्या लोकसभा निवडणुका महाराष्ट्रात एकत्र लढल्या. याही निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढाव्या अशी भाजपची भूमिका आहे. मताचे विभाजन होवु नये. यासाठी आम्ही शेवटच्या मिनीटापर्यंत युतीसाठी प्रयत्न करु. शेवटी शिवसेनेचा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. जे येतील त्यांच्यासह आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय भाजप निवडणुकीला सामोरे जाणारच आहे. असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना येथे दिला. 

दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी टिका करण्यापेक्षा मतभेद असतील समोर येवुन चर्चा करावी. चर्चेतुन मतभेद मिटवावे. चर्चेची दारे खुली आहेत, असेही आवाहन त्यांनी शिवसेनेला केले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी भरत पाटील, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

दानवे म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपने 48 लोकसभा मतदार संघात तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाची प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांनी जी युती निर्माण केली युती 30 वर्षात केवळ एक विधानसभा सोडली तर महाराष्ट्रात कायम आहे. महाराष्ट्रात आम्ही मागच्या लोकसभा निवडणुका एकत्र लढल्या. याही निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्र लढाव्या अशी भाजपची भुमिका आहे. चर्चेतुन मतभेद मिटवावे. चर्चेची दारे खुली आहेत. त्यांनी आमच्या नेत्यांशी चर्चा करावी. चर्चा न करता मतभेद मिटणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Then we will face the Lok Sabha elections without Shivsena - Raosaheb Danwe