विकास निधी वाटपात कोणताही दुजाभाव नाही - सभापती डोंगरे

राजकुमार शहा 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मोहोळ (सोलापूर) : गेल्या पंचवार्षिक व आजच्या दिड वर्षाच्या कामाची तुलना केली तर तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत 36 कोटी 52 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र हा निधी वाटप करताना कुठलाही दुजाभाव केला नसल्याचे प्रतिपादन अर्थ व बांधकाम सभापती विजय राज डोंगरे यांनी केले. 

मोहोळ (सोलापूर) : गेल्या पंचवार्षिक व आजच्या दिड वर्षाच्या कामाची तुलना केली तर तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत 36 कोटी 52 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र हा निधी वाटप करताना कुठलाही दुजाभाव केला नसल्याचे प्रतिपादन अर्थ व बांधकाम सभापती विजय राज डोंगरे यांनी केले. 

मोहोळ तालुक्यातील विविध विभागाच्या तालुका विकास समितीची बैठक सभापती डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती समता गावडे उपसभापती साधना देशमुख गटविकास अधिकारी अजिंक्य येळे जि प सदस्य तानाजी खताळ यांच्यासह तालुका पंचायत समिती सदस्य विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डोंगरे पुढे म्हणाले चालु वर्षाचा सर्व विकास  निधी हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात खर्च करा निधी परत जाऊ देऊ नका चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात अनेक ग्रामपंचायती मागे आहेत. काही अटी असल्या तरी त्यांची पूर्तता करा व निधी खर्च करा शाळा दुरुस्ती साठी निधीची जादा मागणी आहे. मात्र शासनाकडुनच निधी कमी येतो जिल्ह्यात आजपर्यत कुणीही शहिद स्मारकांना निधी दिला नव्हता तो यावेळी दिला असुन जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे दहा शहीद स्मारके मंजुर करण्यात आली आहेत.

तालुक्यातील रस्त्यांना मोठा निधी देऊनही निधीची मोठी मागणी आहे. आता ग्रामपंचायतीनी जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरून होणारी  वाळु वाहतुक बंद केली पाहिजे. त्या साठी सरपंचानी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या सेस मधुन ही जादा निधी तालुक्याच्या विकासासाठी दिला असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. 

विभागनिहाय असा प्राप्त झाला निधी 
बांधकाम विभाग रस्ते हायमास्ट व इतर   10 कोटी 41 लाख 21 हजार 
जलयुक्त शिवार डीपीसी 15 कोटी 54 लाख 27 हजार 
ग्रामिण पाणी पुरवठा 2 कोटी 39 लाख 35 हजार 
समाज कल्याण 5 कोटी 86 लाख 8 हजार 
आरोग्य विभाग बांधकाम दुरूस्ती  65 लाख 94 हजार 
पशुवैद्यकीय विभाग  41 लाख 
शिक्षण शाळा दुरूस्ती  16 लाख 49 हजार
अंगणवाडी दुरुस्ती  17 लाख 
ग्रामपंचायत जनसुविधा  नागरी सुविधा  10 कोटी 1 लाख 

Web Title: there is no any discrimination in distribution of development fund said dongare