तारळी धरणाला धोका नाही; कार्यकारी अभियंत्यांचे प्रसिद्धी पत्रक

1mumbai_0.jpg
1mumbai_0.jpg

तारळे : डांगेष्टीवाडी ता. पाटण येथे तारळी नदीवर बांधलेले धरण भिंतीतून पाझर होत असला तरी तो विहित मर्यादेत असून धरणाला कोणत्याही प्रकारे भगदाड पडण्याचा अथवा फुटण्याचा धोका नाही असे कण्हेर (करवडी) कालवे विभाग दोनच्या कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पत्रकानुसार, 013 साली धरणात पूर्ण क्षमतेने 5.85 टीएमसी पाणी अडविले. धरणाच्या निरीक्षण गॅलरीतून तसेच अनुप्रवाह उतारावरून पाणी पाझर दिसल्यावर ठेकेदारांना गळती पाझर विहित मर्यादेत आणण्याचे सूचित केले. त्यानुसार धरण माथा ते निरीक्षण गॅलरी व पाया गॅलरी गळतीचे, ग्राऊटिंग स्वखर्चाने ठेकेदार करीत आहे. त्याद्वारे एकाने गळती विहित मर्यादेत आणली. इतरांनी 18-19 मध्ये काम करणे अपेक्षित होते. मात्र निरीक्षण गॅलरी ते पाया गॅलरी काम करण्यासाठी धरण रिकामे करावे लागते गेल्या वर्षी ते शक्य झाले नाही. पर्यायी उपाययोजना म्हणून अंदाजपत्रक बनविले असून प्रदेश पातळीवर तपासणीसाठी आहे. आठवड्यातच निविदा प्रसिद्ध करून ठेकेदारांच्या अनामत रकमेतून सदर काम करण्याचे प्रयोजन आहे शिवाय भिंतीच्या पाण्याकडील बाजूस लाटा जलचर पाणी व तत्सम कारणांनी दगडांच्या सांध्यातील सिमेंट निघून गेल्याची शक्यता आहे. त्यात अँकर बार बसवून 50 सेमी जाडीचे M-20 प्रकारचे संधानक पृष्ठभागावर करण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यावर पाझर कमी होईल.

पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतर अधीक्षक अभियंता स्तरावरून धरणाची पाहणी केली जाते. तो अहवाल पाहून आवश्यकतेनुसार धरण सुरक्षा संघटना, अधीक्षक अभियंता नाशिक, धरणास भेट देऊन मार्गदर्शक सूचना देतात. 

दरवर्षी धरणातील, गॅलरीतील व अनुप्रवाह पृष्ठभागावरून पाझरणारे पाण्याचे नमुने व ब्लिचिंग मटेरिअलचे नमुने नाशिकच्या मेरी प्रयोग शाळेत पाठवून चाचणी निष्कर्ष काढून धरणाची सुरक्षितता तपासून आवश्यक भासल्यास उपाय योजण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे सद्यस्थितीत धरणाला भगदाड पडण्याची शक्यता नाही. धरणाला कसलाही धोका नाही. 

एसआयटी चौकशी
 मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समितीने धरणाची पाहणी करून बांधकामात ग्राऊंटिंग, मोनोलीथ जॉइन्टवरील गळतीसाठी केमिकल ग्राऊंटिंग करण्यात आले आहे. गळतीचे प्रमाण कमी झाले. परंतु गळती विहित मर्यादेत आणण्यासाठी अद्यापही ग्राऊंटिंग, गनायटिंग, ड्रायफ्रागम कँक्रिट, केमिकल ग्राऊंटिंग करणे आवश्यक आहे. ही कामे ठेकेदारांच्या अनामत मधून करण्यात येणार असून त्याचा कुठलाही भार शासनावर पडणार नाही. असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

तारळी धरणाच्या भिंतीमधून व गॅलरीमधून पाणी गळती आहे. हे अधिकाऱ्यांनी मान्य केले असून त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी विहित मर्यादेत गळती आहे. अन्य ठिकाणची गळती मर्यादेत आणण्यासाठीही अधिकारी पुढे सरसावले आहेत. दैनिक सकाळने केलेल्या धरणाच्या वार्तांकणावरून अधिकारी सजग झाले असून गळती बंद करण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com