'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'चा जागर करणाऱ्यांनाच आसरा नाही

police.jpg
police.jpg

उपळाई बुद्रूक (सोलापुर) : भिंतींना गेलेले तडे, पावसाळ्यात गळकी घरे, जीर्ण झालेले बांधकाम, अपुऱ्या खोल्या, अस्वच्छता, वसाहतीची दुरवस्था अशी एक ना अनेक कारणाने जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे व 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' चा जागर करणारे पोलिसच शासकीय वसाहतीपासून दुरवल्याचे चित्र माढा पोलिस ठाण्यात पहावयास मिळत आहे. 

माढा पोलिस ठाण्यात १ पोलिस निरीक्षक, १ पोलिस उपनिरीक्षकसह ४० कर्मचारी कार्यरत आहेत. पोलिस ठाण्याच्या शेजारीच पोलिस वसाहत आहे. परंतु सद्यस्थितीला वसाहतीत १२ चे निवारे उपलब्ध असल्याने २८ पोलिस कर्मचारी शासकीय वसाहतीपासून दुरावले आहेत. वसाहतीची दयनीय अवस्था आहे. पावसाळ्यात या वसाहतीतील निवारे गळतात तर, भिंतीला बरेचसे तडे देखील गेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात जीव मुठीत धरून रहावे लागते. जवळच जुनी पडछड झालेली जुनी पोलिस वसाहत असल्याने पावसाळ्यात सापांचा सुळसुळाट या परिसरात असतो. त्यामुळे रात्री-अपरात्री येथे फिरायचे म्हणजे जीवावर उदार होऊनच. वसाहतीतील खोल्यांची लांबी-रूंदी खुपच कमी असल्याने अपुरी जागेअभावी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची वावरताना कुचंबणा होतेय. एखादा नवा पाहुणा आला तर, झोपायचे कुठे असा प्रश्न उभा असतो? परिसरातील अस्वच्छतेमुळे कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांची तर कुचंबणा होतेयं. 

पोलिस वसाहतीत आवश्यक त्या सुविधांची वानवा असुन, अनेक समस्यांना तोंड देत १२ पोलिस कर्मचाऱ्यांची कुटूंबे नाइलाजाने सध्या येथे वास्तव्यास आहेत. जुन्या वसाहतीकडे तर, संबधित विभागाने दुरूस्तीसाठी दुर्लक्षच केलेले दिसुन येत आहे. त्यामुळे वसाहतीत निवारा नसल्याने व तेथील समस्येच्या त्रासातून सुटकेसाठी उर्वरित कर्मचारी इतर भाडोत्री खोली करून राहतात. जनतेच्या सुरक्षेसाठी २४ तास तत्पर असणारे व कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे मुख्य काम करणारे पोलिसांच्या निवाराची हालअपेष्टा अशी असेल तर, त्यांनी काम कसे करायचे असा प्रश्न देखील उपस्थित राहतो. खरोखरच जर पोलिसांचे जीवनमान उंचवयाचे असेल तर त्याच्या वसाहती राहण्यालायक संबधित विभागाने केल्या पाहिजेत.
 

''वसाहतीतील निवारा दुरूस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असुन पाठपुरावा करून ते दुरूस्ती करून घेऊच व इतर काही समस्या आहेत त्या आमच्या खात्यांमार्फत  सोडवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच पोलिस वसाहतीत नवीन ३२ निवारासाठी प्रस्ताव पाठविलेला आहे. पाठपुरावा करून बांधकाम करून घेऊ.''
- अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधिक्षक , सोलापूर ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com