सोलापूरात आरोग्य विभागच आजारी...

तात्या लांडगे
मंगळवार, 26 जून 2018

सोलापूर : जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये तब्बल 14 डॉक्‍टर तर 145 आरोग्यसेविका व 13 आरोग्य सहायकाची पदे रिक्‍त आहेत. तसेच तीन मोठ्या आरोग्य केंद्रांचा कारभार डॉक्‍टरविना तर सात आरोग्य केंद्रात फक्‍त एकच डॉक्‍टर कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागच आजारी पडल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये 683 पदे मंजूर असून त्यापैकी 438 कार्यरत आहेत. तसेच आरोग्य सहायकांची 77 पदे मंजूर असून सध्या 64 आरोग्य सहायक कार्यरत आहेत. जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 154 डॉक्‍टरांची पदे मंजूर असूनही मागील काही महिन्यांपासून 14 पदे रिक्‍त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये मागील काही वर्षांपूर्वी शासनाने प्रसुतीगृहे बांधली. मात्र, काही आरोग्य केंद्रांमधील प्रसुतीगृहे बांधल्यापासूनच बंद आवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागत असून त्याठिकाणचा खर्च त्यांना परवडणारा नाही. 

परिसरातील सर्वसामान्य रुग्णांचे हाल 
माळशिरस तालुक्‍यातील फोंडशीरस व बोरगाव आणि माढ्यातील उपळाई बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्‍टर कार्यरत नाही. तसेच महाळूंग व पिलीव याठिकाणी एकाच डॉक्‍टरावर काम सुरू आहे. सांगोल्यातील महूद, अक्‍कलकोट तालुक्‍यातील दुधनी, चपळगाव व वागदरी येथील आरोग्य केंद्राही एकच डॉक्‍टर कार्यरत आहे. या आरोग्य केंद्रांमधील बहुतांशी ठिकाणी रुग्णांची संख्या मोठी आहे. पदे मंजूर असूनही अद्यापपर्यंत ती भरली नसल्याने परिसरातील सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. 

आरोग्य विभागाचा जिल्ह्याचा पसारा 
प्राथमिक आरोग्य केंद्रे - 77 
आरोग्य उपकेंद्रे - 437 
रिक्‍त आरोग्य सेविका - 245 
रिक्‍त आरोग्य सहायक - 13 
डॉक्‍टरांची रिक्‍त पदे - 14

Web Title: there is not proper service at health department no doctor in 10 health checkup center