रंकाळ्याचे पाणी बाहेर वाहण्यास एक पायरी बाकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - वाऱ्याच्या वेगाने रंकाळ्याच्या काठाला धडकणाऱ्या लाटा, पाणी आता बाहेर पडते की, नंतर पडते, याकडे लोकांचे लागलेले लक्ष आणि दुपारीच रंकाळा तलावावर झालेली तोबा गर्दी, यामुळे रंकाळाकाठी उत्साहाला आज अक्षरक्षः उधाण आले. 

कोल्हापूर - वाऱ्याच्या वेगाने रंकाळ्याच्या काठाला धडकणाऱ्या लाटा, पाणी आता बाहेर पडते की, नंतर पडते, याकडे लोकांचे लागलेले लक्ष आणि दुपारीच रंकाळा तलावावर झालेली तोबा गर्दी, यामुळे रंकाळाकाठी उत्साहाला आज अक्षरक्षः उधाण आले. 

दुपारनंतर पावसाची संततधार जशी वाढत गेली. तसे रंकाळ्याच्या लाटांनी रौद्र रूप धारण केले. चहूबाजूंनी तलाव तूंडूंब भरून गेला. राजघाट, पांढरा घाड, पद्माराजे उद्यानासमोरील घाट, तांबट कमानीच्या परिसरात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. संध्यामठ बुडण्यासाठी केवळ दोन ते तीन फूटांचेच अंतर राहिले.

26 जुलै 2005 ला रात्री साडेनऊच्या सुमाराल रंकाळा भरून वाहिला होता. रंकाळा टॉवरच्या बाजूने धबधब्यासारखे पाणी कोसळले होते. आज पावसाचा जोर पाहता रंकाळा आज ओंलाडणार अशी अटकळ बांधली गेली. व्हॉटअऍपवरून मेसेज फिरले. दुपारी एक ते चार यावेळेत काठाला जत्रेचे स्वरूप आले.

उत्साही तरूणांनी पाण्यात उडी घेऊन पोहण्याचा आनंद लुटला. तीनच्या सुमारास राजघाटावर लाटा धडकू लागल्या. पांढरा घाट, राजघाटावर अशीच स्थिती राहिली. पाणी ओलांडल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. परताळ्याच्या बाजूने पाण्याला वाट करून दिल्याने मागील बाजूनेही पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत होते. भर पावसात मोबाईलवर अनेकांनी सेल्पीचा आनंद लुटला. लहान मुलांपासून महिला. मुले, मुलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. जुना राजवाडा पोलिस सातत्याने पाणी वाढल्याचे सांगून लोकांना मागे हटण्याचा इशारा देत होते. काही राजघाटावर दोर बांधून लोकांना तेथे येण्यास मनाई केली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is one step left to flow the Rankala water