मॉलमध्ये आग...पळापळ...आणि सुटकेचा निश्वास..!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

आग विझविण्यासाठी तातडीने अग्नीशमन यंत्रणा आली. सोबत रुग्णवाहिका, पोलिस, क्रेन आदी यंत्रणा काही मिनीटात दाखल झाली.

इचलकरंजी - येथील डी मार्ट मॉलमध्ये अचानक आज सकाळी आग लागली. त्यामुळे सायरन वाजवून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना तातडीनेे बाहेर काढण्यात आले. यावेळी ग्राहकांची तारांबळ उडाली. आग विझविण्यासाठी तातडीने अग्नीशमन यंत्रणा आली. सोबत रुग्णवाहिका, पोलिस, क्रेन आदी यंत्रणा कांही मिनीटात दाखल झाली. धूर येत असलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यात आला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. पण कांही वेळानंतर ही खरी आग लागलेली नसून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक असल्याचे सांगितल्यानंतर सगळ्यानी सुटकेचा नि:श्वास टाकला.

आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत. त्याची पूर्व तयारी म्हणून आज डी मार्ट मॉल येथे आगीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. इमारतीवर धूर करण्यात आला. त्यानंतर आग लागल्याची माहिती सर्व यंत्रणेला दिली. त्यानंतर मॉलमध्ये सायरन वाजवून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना सूचना दिली. त्यानंतर ग्राहकांची पळापळ सुरू झाली. नंतर मात्र ही खरीखरी आगीची घटना नसून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत डेमो असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांंगण्यात आले. यावेळी पालिकेचे अतिरीक्त मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्यासह गॅरेजसह पोलिस, रुग्णालय आदी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There was a fire at Ichalkaranjeet Mall