शासकीय तंत्रनिकेतनमधील " इतके' अभ्यासक्रम होणार बंद

प्रमोद बोडके
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

पाच ठिकाणी नवीन अभ्यासक्रम
शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूर व विक्रमगड येथे येत्या शैक्षणिक वर्षापासून सिव्हिल इंजिनिअरिंग, अमरावती येथे केमिकल इंजिनिअरिंग, ब्रह्मपुरी येथे मायनिंग इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. नागपूर येथील तंत्रनिकेतनमध्ये मॅकॅट्रॉनिक्‍स हा अभ्यासक्रम नव्याने सुरू केला जाणार आहे

सोलापूर :  महाराष्ट्र राज्यातील दहा शासकीय तंत्रनिकेतनमधील 19 अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम बंद होणार आहेत. चार शासकीय तंत्रनिकेतनमधील अभ्यासक्रमांची क्षमता 60 वरून 30 केली जाणार असून, पाच तंत्रनिकेतनमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

बंद होणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील टेक्‍स्टाईल मॅन्युफॅक्‍चरर्स या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. गिरणगाव म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहरात या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थीच मिळत नसल्याने हा अभ्यासक्रम बंद करण्याची नामुष्की तंत्रशिक्षण विभागावर आली आहे. सोलापूरप्रमाणे कोल्हापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असलेला शुगर टेक्‍नॉलॉजी हा देखील अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून बंद केला जाणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधीलच अभ्यासक्रम बंद करण्याची वेळ आली असेल तर खासगी तंत्रनिकेतनची स्थिती न विचारलेलीच बरी. देशातील व राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील मंदीचा मोठा फटका रोजगार निर्मितीवर आणि रोजगार निर्मितीचा मोठा फटका अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांवर बसल्याचे समोर येऊ लागले आहे.

हेही आवर्जून वाचा... या शहरात जन्मणारी मुलगी होणार लखपती

बंद होणारे अभ्यासक्रम

हिंगोली : इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी
 जिंतूर : इन्स्ट्रमेन्शन इंजिनिअरिंग व इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन
 पेण : सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स
 विक्रमगड : इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन
 ब्रह्मपुरी : इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन व इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी
 गडचिरोली : इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन
 अहमदनगर : ऍटोमोबाईल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर टेक्‍नॉलॉजी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
 नंदुरबार : इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन
 कोल्हापूर : शुगर टेक्‍नॉलॉजी
सोलापूर : टेक्‍स्टाईल मॅन्युफॅक्‍चरर्स

हेही वाचा... चंद्रकांतदादा पाटील कशाचा अभ्यास करताहेत

प्रवेशक्षमता 60 वरून 30 केलेले अभ्यासक्रम
 साकोली : इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन
 ब्रह्मपुरी : इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन
 गडचिरोली : कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
 मिरज : मेडिकल इलेक्‍ट्रॉनिक्‍स

.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be "so many" courses in government polytechnic closed