दूध दर वाढीबाबत आंदोलनात असेल पोलिसांचा कडक बंदोबस्त

राजकुमार शहा 
रविवार, 15 जुलै 2018

दुध दर वाढीबाबत उद्यापासुन शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंद्रमौळी औद्योगिक वसाहत, मोहोळ शहरातील शिवाजी चौक, सावळेश्वर टोल नाका, पेनूर, पाटकुल, शेटफळ, टाकळी, सिकंदर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

मोहोळ - उद्या पासुन सुरू होणाऱ्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर वाढीबाबत आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन मोहोळ पोलिसांनी सात ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला असुन तालुक्यातील दुध संकलन केंद्र चालक व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.

दुध दर वाढीबाबत उद्यापासुन शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंद्रमौळी औद्योगिक वसाहत, मोहोळ शहरातील शिवाजी चौक, सावळेश्वर टोल नाका, पेनूर, पाटकुल, शेटफळ, टाकळी, सिकंदर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

टाकळी, सिकंदर, पेनूर, शेटफळ, या ठिकाणी बिनतारी संदेश यंत्रणा उभारली आहे. त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने तासा तासाला घडणाऱ्या घडामोडी वरिष्ठांना कळविण्याच्या आहेत. मोबाईल गस्तीसाठी तीन सरकारी वाहने व खाजगी वाहने तैनात करण्यात आली आहेत एकुण चार अधिकारी व पंचवीस पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विक्रम बोधे उपनिरीक्षक अन्वर मुजावर गोपनीय विभागाचे निलेश देशमुख यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पोलिस पाटलांची प्रथमच नेमणुक -
अंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर प्रथमच पोलिस पाटलांना पाचारण करण्यात आले असुन त्यांनी आपापल्या गावातील व इतर दुध संकलन केंद्रावर थांबुन पोलिसांना सहकार्य करुन अहवाल दयावयाचा आहे.

कामती पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी बंदोबस्त -
उद्याच्या दुध दर वाढीच्या अंदोलनाच्या पार्श्वभुमीवर कामती पोलिसांनी कुरूल बेगमपूर कामती या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला असुन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्याची माहिती कामतीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली.

आमच्या वर पोलिस विभागाने प्रथमच संरक्षणाची जबाबदारी दिली असून आम्ही पोलिसांना चांगल्या प्रकारे सहकार्य करून ती उत्तम प्रकारे पार पाडू. - तात्या पाटील (अध्यक्ष पोलिस पाटील संघटना मोहोळ तालुका)

Web Title: There will be strict protection for agitation against the increase in milk prices.