esakal | ...म्हणून पवार साहेबांनी फाेन घेणे टाळले
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Top Breaking Stories In Marathi

ज्येष्ठ नेते य़शवंतराव चव्हाण यांची आज (साेमवार) पुण्यतिथी आहे. या निमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार कऱ्हाड येथे आले हाेते. सकाळी सव्वा आठ ते दुपारी बारावाजेपर्यंतच्या प्रवासात व वेगवेगळ्या कार्यक्रमात ते रममाण झाले हाेते. 

...म्हणून पवार साहेबांनी फाेन घेणे टाळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार सकाळी सव्वा आठच्या सुमारास कऱ्हाडला पोचले. त्यांनतर त्यांनी दुपारी सव्वा बारावाजेपर्यंत एकही फोन रिसिव्ह केला नाही. तास तास त्यांनी फोनवरील संभाषण पूर्णपणे टाळले होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी ते युवकांशी गप्पात व यशवंत ज्योतीच्या स्वगातासह आभिवदानात, भजनातही रमले होते.


''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 


ज्येष्ठ नेते य़शवंतराव चव्हाण यांची आज (साेमवार) पुण्यतिथी आहे. त्या निमित्त राज्यातील अनेक बड्या नेत्यांची येथे उपस्थिती असते. दरवर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रीगण येतात. मात्र यंदा सत्ता स्थापनेचा घाेळ मुंबईत सुरू आहे. त्यामुळे ते लोक येणार नाहीत स्पष्ट होते.

यशवंतराव चव्हाण समाधीस्थळीस अभिवानदन

मात्र त्या सगळ्या घाई गडबडीतही ज्येष्ठ नेते शरद पवार येथे येणार
असल्याचे रविवारी रात्री जाहीर करण्यात आले होते. ते सकाळी सव्वा आठ वाजता येणार होते. ते आलेही, त्याच वेळेत. ते  विमानतळावरून थेट ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी पोचले. त्यांनी अभिवानदन केले.

हेही वाचा -  आता उदयनराजेंकडे ही नवी जबाबदरी

त्यावेळी त्यांनी तेथे सुरू असलेल्या भजनाला काही काळ उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी यशवंत समता ज्योत घेवून येणाऱ्या युवकांशी संवाद साधला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण समता ज्योतीचे अनावरण केले. 

युवकांकडून शरद पवारांचा जयघोष

तेथून ते वेणूताई चव्हाण ट्रस्टवर गेले. तेथेही बैठकीत ते दिलखुलास बोलले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महत्वाच्या निर्णयावर सदस्यांची चर्चा केली. पवार यांनी प्रसिद्धी माध्यामांशी वार्तालापही केला. पत्रकारांच्या प्रश्नाला तितक्याच दिलखुलापणे उत्तरे दिली. त्यानंतर ते सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या कार्यक्रमात पोचले. तेथेही त्यांच्या
चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. युवकांनी खचाखच भरलेला मंडपाने त्यांना उभा राहून व टाळ्या वाजवून अभिवादन केले. युवकांनी त्यांच्या जयघोषच्या घोषणाही दिल्या. त्यावेळी युवकांना हात उंचावून त्यांनी अभिवादन केले.

हेही वाचा -  अजित पवारांमागे माझा हात नाही : शरद पवार

कार्यक्रमातही ते रूळले. त्यावेळी त्यांचे स्नेही व निकटवर्तीय ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्याशी गप्पा मारण्यात रमले होते. काही नव्या जुन्या आठवणींना उजाळाही त्यांनी त्यावेळी दिला. त्यावेळी दोघांचेही चेहरे खुलले होते. त्यांनतर त्यांनी प्रा. पाटील यांच्या सत्कारानंतर सभेला संबोधीत केले. त्यावेळच्या भाषणातही त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण ते प्रा. एन. डी.
पाटील यांच्या पर्यंतचा प्रवास अत्यंत कमी वेळेत मांडला. त्यावेळीही झालेल्या गमती जमतींचाही ऊहापोह त्यांनी केला.

भाषण संपताना त्यांनी माझ्याकडून तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती करुन घ्यायच्या आहेत. मात्र ते हे व्यासपीठ नाही. त्यामुळे मी त्यावर काहीही चर्चा करणार नाही, अशी टिपण्णी करत भाषणाचा समारोप केला. 

हेही वाचा -  महाराष्ट्रात महाविकासआघाडीचेच सरकार : शरद पवार

सकाळी सव्वा आठ ते दुपारी बारावाजेपर्यंतच्या प्रवासात व वेगवेगळ्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकही फोन रिसिव्ह केला नाही किंवा मुंबईत काय चालले आहे, याची जाणीवही उपस्थितांसह त्यांच्या सोबत असणाऱ्यांना होवून दिली नाही. ती त्यांची वेगळी अदा आज (साेमवार) कऱ्हाडकरांना अनुभवयास मिळाली.

loading image