कॉंग्रेसकडून विधानसभेसाठी "हे' आहेत सोलापुरातील इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहरातील तीन आणि जिल्ह्यातील चार विधानसभांसाठी आज दुपारी तीन वाजल्यापासून मुलाखती होणार आहेत.

- आमदार शरद रणपिसे आणि प्रकाश सातपुते हे मुलाखती घेणार आहेत. 

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहरातील तीन आणि जिल्ह्यातील चार विधानसभांसाठी आज दुपारी तीन वाजल्यापासून मुलाखती होणार आहेत. आमदार शरद रणपिसे आणि प्रकाश सातपुते हे मुलाखती घेणार आहेत. 

सोलापूर शहर उत्तर : राजन कामत, सुदीप चाकोते आणि सातलिंग शटगार. 
सोलापूर शहर मध्य : आमदार प्रणिती शिंदे, असिफ इक्‍बाल शेख, इश्‍ताक जहागिरदार, दत्तात्रय लोकरे 
दक्षिण सोलापूर : प्रशांत कांबळे आणि हरिष गुरुनाथ पाटील 
अक्कलकोट : आमदार सिद्धाराम म्हेत्रे, धर्मराज राठोड, महिबूब मुल्ला, श्रीकंठ महास्वामी आणि सातलिंग शटगार 
मोहोळ : गौरव खरात आणि किशोर पवार 
पंढरपूर : आमदार भारत भालके आणि शिवाजीराव काळुंगे 
बार्शी : डॉ. विजय साळुंके, ऍड. जीवनदत्त आरगडे, हाजी रमजान पठाण आणि नागनाथ चव्हाण. 

मोहोळ आणि बार्शी हे मतदारसंघ आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत. आघाडी
नाही झाली तर पर्याय म्हणून या दोन मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचे
सांगण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांनी फक्त शहर मध्यसाठी अर्ज दिला आहे. त्यामुळे त्या मोहोळमध्ये निवडणूक लढविण्याची चर्चा तूर्त तरी थांबणार आहे. अक्कलकोटमधून श्रीकंठ स्वामी यांनीही उमेदवारी मागणी केली आहे. विशेष म्हणजे
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघासाठी "ताकतवर' उमेदवाराने मागणी केली नाही. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These are the aspirants from Solapur for the Legislative Assembly from Congress