'या' वस्तूंची वाढली दुप्पट मागणी; सायंकाळी दारही बंद!

विजयकुमार कन्हेरे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

- डासांपासून बचाव म्हणून उपाययोजना 
- मलेरिया, डेंगीसदृश आजाराचे प्रमाण वाढले 
- डासांपासून बचाव करणाऱ्या अगरबत्ती, लिक्विडला मागणी 

कुर्डुवाडी (सोलापूर) : पूर्वी संध्याकाळच्यावेळी लक्ष्मी येते म्हणून घराचे दार उघडे ठेवले जायचे. परंतु सध्या डास घरात येऊ नये म्हणून बऱ्याच घरांची दारे बंद ठेवलेली दिसत आहेत. 

हेही वाचा : शिवसेनेतील हा गट म्हणतो भाजपकडे परत चला... 

गेल्या काही दिवसांमध्ये डासांमुळे होणाऱ्या मलेरिया, डेंगीसदृश, विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांत लक्षणीय वाढ झाली आहे. आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून उपाययोजना करणे चांगले, असा विचार करून बहुतांश नागरिक डासांपासून बचाव करणारी अगरबत्ती, लिक्विड, कार्ड, बॅट किंवा इतर साहित्य वापरताना दिसत आहेत. या वस्तूंची विक्री देखील वाढली असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांसाठी रोलऑनची मागणी जास्त आहे. 

हेही वाचा : कॉंग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी करू नये... 

शहरांबरोबर निमशहरी व ग्रामीण भागातही डासांपासून होणाऱ्या आजारांनी थैमान घातले आहे. काही रुग्णांना मृत्यूने कवटाळले तर काही मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. या प्रकारच्या आजारामध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी यासह इतर लक्षणे दिसून येत आहेत. प्रत्येक ताप हा डेंगीचा ताप असेल असे नाही. परंतु धोका पत्करायला नको म्हणून अनेक नागरिक दिवसभर कामाच्या ठिकाणी अथवा घरात दिवसभर डासांना पळवून लावणाऱ्या लिक्विड किंवा अगरबत्तीचा उपयोग करत आहेत. परंतु याचा सतत वापर केल्याने याचा आपल्या शरीरावर दुसरा कोणता वाईट परिणाम होणार की नाही याचा विचार करायला हवा. काही नागरिक आयुर्वेदिक तेलाचा वापर करत आहेत. घराघरात क्रिकेटची नव्हे तर डासांना मारणारी बॅट दिसत आहे. 

दोन महिन्यांत दुप्पट मागणी 
दोन महिन्यांत डासांपासून बचाव करणाऱ्या साहित्यांची मागणी जवळपास दुप्पट झाली आहे. लहान मुलांसाठी डास चावू नये म्हणून कपड्याला लावले जाणारे रोलऑनची मागणी जास्त आहे. 
- कुणाल कऱ्याडे, विक्रेता, कुर्डुवाडी 

दिवे लागणीला दरवाजे बंद 
पूर्वीच्या काळी सायंकाळी दिवे लागणीला घराचे दरवाजे उघडे ठेवत. कारण संध्यासमयी लक्ष्मी घरात येते असा संकेत आहे. पण डासांचे आगमन हे साक्षात असल्यामुळे आज दिवे लागणीला दरवाजे, खिडक्‍या बंद केल्या जातात. 
- चंद्रकांत महामुनी, ज्येष्ठ नागरिक, कुर्डुवाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These goods Double demand