ते आले आणि तीन मिनीटात परत गेले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

इचलकरंजी : ते आले... दोन ते तीन मिनिटात पाहणी केली... आणि कोणाशीही न बोलता थेट गाडीत बसून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची ही धावती भेट उलट सुलट दिशेने चर्चेची ठरली. 

इचलकरंजी : ते आले... दोन ते तीन मिनिटात पाहणी केली... आणि कोणाशीही न बोलता थेट गाडीत बसून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची ही धावती भेट उलट सुलट दिशेने चर्चेची ठरली. 

पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न सध्या गाजत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री कदम यांनी शिरोळ तालुक्यातील हेरवाड बंधारा या ठिकाणी पाहणीसाठी आले होते. त्यानंतर परताना त्यांनी इचलकरंजी येथे टाकवडे वेस येथील काळ्या ओढ्यालगत शहरातील मिसळणाऱ्या पाण्याची पाहणी करण्यासाठी आले होते. पक्षाचे काही कार्यकर्ते वगळता शहरातील कोणीच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. प्रसारमाध्यमांना कदम या ठिकाणी येणार असल्याची माहिती मीळाली होती. या प्रतिनिधी व्यतिरिक्त इचलकरंजीचे प्रतिनिधीत्व करणारे कोणीच नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.

कदम हे गाडीतून उतरले. त्यांच्यासोबत शिरोळचे आमदार उल्हास पाटील हेही होते. त्यांनी इचलकरंजी शहरातील सांडपाणी काळ्या ओढ्याद्वारे थेट पंचगंगा नदीत कसे मिसळते याची माहिती दिली. त्याचबरोबर उद्योगातून येणारे पाणी प्रक्रिया न होताच येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या व्यतिरिक्त या प्रश्नावर त्यांना कोणालाच माहिती देता आली नाही. कारण जेम तेम दोन ते तीन मिनिटंच या ठिकाणचा त्यांचा दौरा ठरला.

वास्तविक पंचगंगा नदी प्रश्नावरून सध्या वातावरण संवेदनशील बनले आहे. या प्रश्नी विविध ठिकाणी आंदोलनेही होत आहेत. इचलकरंजीतील नेमकी समस्या त्यांनी समजून घेणे अपेक्षीत होते. मात्र तेही जास्त वेळ थांबले नाहीत आणि पालिकेचे कोणीच प्रतिनिधी त्यांच्या दौऱ्या वेळी फीरकले नाहीत. त्यामुळे ते आले... थोडा वेळ थांबले... आणि निघून गेले अशीच अवस्था राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याबाबतीत झाली.

Web Title: They came and went back in three minutes