'हे' करत आहेत 20 वर्षे जळगाव ते पंढरपूर वारी

राजकुमार शहा 
गुरुवार, 19 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) : मनात विठ्ठलाची भक्ती व त्याच्या भेटीची लागलेली ओढ यासाठी आम्ही गेल्या वीस वर्षांपासून रावेर (ता. जळगाव) ते पंढरपूर अशी सातशे किमीची सायकल वारी करीत आहोत. सातशे किमी अंतर पार करण्यास आठ ते नऊ दिवसाचा कालावधी लागतो, अशी माहिती रावेर येथील गोकुळ रामलींग राजपुत यांनी दिली. 

गोकुळ म्हणाले, आमच्या गावात चौदा ते पंधरा जणांचा ग्रुप आहे. आमच्या पैकी कोणी कारागीर कोणी मेकॅनिक तर कोणी शेंगदाणे फुटाण्याचा छोटा व्यवसाय करतो. वारीला जायचे म्हणले की, आम्ही सर्व व्यवसाय बंद ठेवतो व ग्रामदैवताचे दर्शन घेऊन वारीला रवाना होतो. सायकलला चोहोबाजुनी लावलेल्या भगव्या पताका मनोरंजनासाठी सायकललाच बसविलेला टेप आवाजासाठी पुढे बांधलेला साऊंड बॉक्स तर मागील कॅरेजवर बांधलेली बॅटरी अशी यंत्रणा असते. 

रस्त्यात अनेक जण वारकरी सेवा म्हणुन चहापान करतात. कोणी जेवण नाष्ट्याची व्यवस्था करतात. कंटाळा आला की, टेप लाऊन भक्ती गीते लाऊन त्या संगीताच्या तालावर अंतर पार करावयाचे असा आमचा दिनक्रम असुन प्रवासात ज्या ज्या परिसरात जाऊ त्या ठिकाणची नवनवीन संस्कृंती पाहावयास व अनुभवास मिळते विठ्ठलाचे दर्शन झाले की परत फिरतो. 

Web Title: they goes to wari from last 20 years jalgao to pandharpur wari