...त्यांनी नगरसेवकांची चेष्टा लावली आहे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सातारकरांनो... मी राधिका रोड बोलतोय... अशा वेगवेगळ्या मथळ्या खालील सकाळ व ई - सकाळने मांडलेल्या बातम्यांची दखल घेत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. 

सातारा : वृत्तपत्रांनी साताऱ्यातील रस्ते, आरोग्य कचऱ्याची समस्या यावर गत काही दिवसांपासून आवाज उठविला आहे. त्यावर वर्तमानपत्रांनी योग्य भूमिका बजाविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आम्हाला लाज वाटते. प्रशासनाचा बोंगळ कारभार चालणार नाही, असा इशारा नगरसेवक दत्ता बनकर यांनी दिला. पत्रकार साताऱ्याविषयी पोटतिडकीने मांडत आहेत. वृत्तपत्रांनी आमच्या डोळ्यात अजंन घातले. तरीही सीओ जबाबदारीची भूमिका बजावत नाहीत, त्यांनी नगरसेवकांची काय चेष्टा लावली आहे, असा घणाघात पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी केला. 

सातारा पालिकेची गुरुवारी (ता. सात) विशेष सभा झाली. या सभेपुर्वी बहुतांश सदस्यांनी शहरात नागरीकांना भेडसाविणाऱया विविध समस्यांचा पाढा वाचला. खराब रस्ते, चौका-चौकांतील साचणारा कचरा या विषयांवर भर होता. बहुतांश विषय हे सकाळ आणि ई - सकाळच्या माध्यमातून मांडण्यात आले होते.

सातारकरांनो... मी राधिका रोड बोलतोय... या मथळ्या खालील बातमीतून साताऱ्यातील राधिका रस्त्याचे सचित्र दर्शन ई - सकाळवर मांडण्यात आले. या ठिकाणी पालिकेने खडी, मुरम टाकून तात्पूरती मलमपट्टी केली. पून्हा डांबर लावून गुळगुळीत केले. पण आज पुन्हा जागोजागी खडी उखडल्याने कोणी तरी लचके तोडल्यासारखी रस्त्याची स्थिती झाल्याचे नमूद केले. तसेच ग्रेड सेपरेटरमुळे पोवई नाक्‍यावर झालेल्या रस्त्यांवरील खडड्यांमुळे होणारी वाहनधारकांना भेडसाविणारी अडचण मांडण्यात आली. या सर्व वृत्तांचे दखल घेत नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले.

नगरसेवक दत्ता बनकर यांनी साताऱ्यातील रस्ते, आरोग्य कचऱ्याची समस्या यावर गत काही दिवसांपासून माध्यमांतून आवाज उठविला जात आहे. तरी देखील प्रशासान काहीच करीत नाही, याची आम्हांला लाज वाटते. यापूढे प्रशासनाचा बोंगळ कारभार चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार साताऱ्याविषयी पोटतिडकीने मांडत आहेत. वृत्तपत्रांनी आमच्या डोळ्यात अजंन घातले. तरीही सीओ जबाबदारीची भूमिका बजावत नाहीत, त्यांनी नगरसेवकांची काय चेष्टा लावली आहे, असा घणाघात पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी केला.

प्रशासनावरील वेगवेगळ्या आरोपांमुळे सभा गाजली. मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर अनेक नगरसेवकांनी तोफ डागली. आठ दिवस पाण्याची गाडी बंद, लोक शिव्या देताहेत. फोन केले तर ते फोन उचलत नाहीत.भर दिवाळ सणात ते आऊट ऑफ कव्हरेज होते असा आरोप आंबेकर यांनी केला. या आराेपांमुळे व त्यांना एकेरी संबाेधिल्यामुळे मुख्याधिकारी यांनी सभागृह साेडले. त्यानंतर उपाध्यक्ष किशाेर शिंदे यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांच्याकडे जाऊन सभागृहाचे कामकाजाबाबत चर्चा केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... they have ridiculed corporators