वंचित, गरजू आणि दिनदुबळ्यांची दिवाळी 'त्यांनी' केली गोड

रविकांत बेलोशे 
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

भिलार : आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांच्यासाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या भावनेतून 'त्यांनी' केली वंचित, गरजू आणि दिनदुबळ्यांची दिवाळी गोड. दिवाळीच्या लखलखाटात गोरगरीबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडतच साजरी होते.

भिलार : आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांच्यासाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या भावनेतून 'त्यांनी' केली वंचित, गरजू आणि दिनदुबळ्यांची दिवाळी गोड. दिवाळीच्या लखलखाटात गोरगरीबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडतच साजरी होते. या फाटक्या तुटक्या वंचित घटकांची दिवाळी आनंदाने जावी, त्यांनाही काही क्षण गोड-धोड खाऊन, लखलखाट जाणवावा या उद्देशाने आमदार शशिकांत शिंदे आणि सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या प्रेरणेने स्थापलेल्या "स्वराज्य सेवाभावी सामाजिक संस्थेतर्फे "एक पाऊल माणुसकीकडे" ह्या उपक्रमा अंर्तगत आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला.

"एक पाऊल माणुसकीकडे" या उपक्रमांतर्गत स्वराज्य सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे यांनी आपल्या संस्थेच्या सर्व सभासदाना एकत्र करून परिसरातील रहिवाशांकडून दिवाळी, फराळ, कपडे, पांघरून असे साहित्य गोळा केले. हे सर्व साहित्य बस स्थानक, प्लॅट फॉर्म, गरीब वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन या सभासदांनी हे साहित्य त्यांना दिले. या अनोख्या दिवाळी फराळ भेटीने त्यांची दिवाळी गोड झाली. 

ज्यांना घालायला कपडे नाहीत.अशांना कपडे दिल्याने त्यांना मात्र या संस्थेमुळे मायेची ऊब दिवाळीमधून मिळाली. या अनोख्या भेटीमुळे वंचित गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला. आपणही आपल्या दिवाळीमधून या वंचितांना आनंदाचे काही क्षण दिल्याच समाधान या कार्यकर्त्यांच्या मनात दाटून आले होते. अशा उपक्रमामुळे सामाजिक जाणिवेची भावना आमच्या युवकांमध्ये जागृत करण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करीत असल्याचे सुहास शिंदे यांनी यावेळी सांगितले. 
 

Web Title: they made The poor and needy people's Diwali happy