पोलिसांच्या गोळीबारात चोरटा ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

सोलापूर - रात्र गस्तीवेळी चोरट्यांच्या टोळीला हटकल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात एक चोरटा ठार झाला असून, पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह तिघे पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे सोलापूरजवळील उळेगाव परिसरात घडली.

विनायक देविदास काळे (वय 30, रा. तळे हिप्परगा, उत्तर सोलापूर) असे ठार झालेल्या संशयित चोरट्याचे नाव असून, या घटनेत पोलिस निरीक्षक विजय पाटील, पोलिस कर्मचारी विक्रम दराडे, विकास फडतरे हे जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे उळे गावाजवळ पोलिस गस्त घालत असताना त्यांना पाच-सहा चोरटे दिसले. त्यातील एकाला पकडून वाहनात बसवत असताना चोरट्याने हातातील तलवारीने विजय पाटील यांच्या हातावर व मांडीवर हल्ला केला. बचावाच्या उद्देशाने पाटील यांनी गोळीबार केला. त्यात विनायक काळे हा जखमी झाला व इतर साथीदार पळून गेले. विनायकला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

काळेच्या कुटुंबीयांचे आंदोलन
ही चकमक बनावट असल्याचा आरोप करत चकमकीत ठार झालेल्या विनायक काळेचे कुटुंबीय व समाज बांधवांनी आंदोलन केले. गोळीबार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Thief Death in Police Firing