हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांचा बंगला फोडला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

छत्रपती कॉलनी येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचा बंगला आहे. सध्या त्यांचे कुटुंब पुणे येथे राहते. अधुन मधुन ते कोल्हापूरात येतात. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

कोल्हापूर : मणेरमळा छत्रपती कॉलनी येथील हिंदकेसरी गणपतराव कृष्णाजी आंदळकर यांचा बंद बंगला चोरट्यांनी फोडला. मुख्य दरवाजा तोडूनच सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याची नोंद शाहुपुरी पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू आहे. 

छत्रपती कॉलनी येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचा बंगला आहे. सध्या त्यांचे कुटुंब पुणे येथे राहते. अधुन मधुन ते कोल्हापूरात येतात. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतील बेडरूमसह इतर खोल्यातील सात लोखंडी व लाकडी कपाटे उचकटून काढली. त्यातील चार तोळ्याचे व दोन तोळ्याचे मंगळसुत्र असे सहा तोळ्याचे दागिने लंपास केले.

आज सकाळी घरकामासाठी आलेल्या महिलेला दरवाजा तुटलेला दिसला. त्याने याची माहिती त्यांचे नातेवाईक उमेश पोवार यांना दिले. ते घरात आले. त्यांनी शाहूपुरी पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. येथे श्‍वानपथक व ठसेतज्ञांना पोलिसांनी पाचारण केले.

Web Title: thief in Hindkesri Ganapatrao Andalkar bungalow in Kolhapur