कऱ्हाड : महामार्गावर ट्रकचालाकास लुटणारे चौघेही अल्पवयीन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

लॉटरी, जुगारासाठी त्यांनी गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे. शनिवारी मध्यरात्री मालट्रकला पाचवड फाटा येथे रिक्षा आडवी मारून लुटण्यात आले. त्या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला.

कऱ्हाड : महामार्गावर ट्रकचालाकास अडवून लुटणारे चौघेही संशयीत अल्पवयीन निघाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. संबधित संशयीतांनी अजूनही दोन ते तीन गुन्हे केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र ते संशयीत अल्पवयीन निघाल्याने त्या गुन्ह्यांच्या अनुशंगाने त्य़ांच्याकडे तपास कसा करायचा, याचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

लॉटरी, जुगारासाठी त्यांनी गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे. शनिवारी मध्यरात्री मालट्रकला पाचवड फाटा येथे रिक्षा आडवी मारून लुटण्यात आले. त्या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला. गुन्हा घडल्यानंतर त्याची माहिती पोलिसांनी वायरलेसवरून दिली होती. त्यानुसार बोरगाव पोलिसांच्या मदतीने रिक्षासह एका संशयीतास अटक झाली. मात्र अन्य दोघे पळाले होते. अटक संसयीताने त्यांचे वय 19 असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी त्यास अटक केली. मात्र त्याचे खरे रेकॉर्ड तपसाले. त्यावेळी त्याने सांगितलेले वय खोटे असल्याचा पुढे आले.

त्यानंतर काल पोलिसांना छापा टाकून या प्रकरणात अन्य दोघांना पकडले. तेही दोघेजण अल्पवयीन अशल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी तिघांचेही खरे रेकॉर्ड तपासले आहे. त्यानुसार ते तिघेही अलप्वयीन असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्याकडे संबधित गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास कसा करायचा अशा प्रश्न पोलिसांसमोर आहे. ट्रकचालकास लुटीवेळी पोलिसांनी संबधितांकडे कसून चौकशी केली आहे. त्यावेळी आणखी दोन गुन्हे संशयीतांना केल्याचे पुडे येत आहे. मात्र सारेच संसयीत अल्पवयीन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे तपास कसा करायचा, असा प्रश्न पोलिसासमोर निर्माण झाला आहे. संबधितांना बाल न्यायालयात हजर करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून निघणाऱ्या अन्य गुन्ह्याची माहितीही पोलिसांना मिळू शकणार नाही. तिघांनाही केवळ व्यसानापायी गुन्हे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातील दोघांना ऑन लाईन लॉटरीचा नाद आहे. त्यासाठी लागमारा पैसा अशा लुटीतून येते. दुसऱ्या एखास जुगाराचा नाद आहे. त्यामुळे पोलिसही त्यांच्या या प्रखराने चक्रावून गेले आहेत.

Web Title: thief in Karad

टॅग्स