चोराच्या वाहनांवर ‘पोलिस’

Police
Police

कोल्हापूर - सावधान..! वाहनावर ‘पोलिस’ असे लिहून बिनधास्तपणे फिरणारा चोरटाही असू शकतो... हे पोलिसांच्याच कारवाईतून आज उघड झाले. तोतया पोलिसाने मोटारसायकल चोरीची कबुली दिल्याने खुद्द पोलिसांच्याच पायाखालची वाळू सरकली. मोटारसायकल चोरीची, त्यावर ‘पोलिस’ लिहून पोलिस असल्याच्या रुबाबात एक चोरटा आज ताराबाई पार्क येथून जात होता. गस्त घालणाऱ्या पोलिसांना संशय आला, त्यांनी पाठलाग करून त्याला पकडले. कोणत्या ठाण्यात काम करतोस, याबाबत विचारणा केली. तसा तो चाचपडला. उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. चौकशीत तो मोटारसायकल चोरटा निघाला.

चोरलेल्या मोटारसायकलच्या नंबर प्लेट बदलल्या. एवढंच नव्हे तर मोटारसायकलवर त्याने ठळक अक्षरात ‘पोलिस’ असे लिहिले. आज गस्त घालणाऱ्या पोलिसांना त्याची शंका आली म्हणून तो सापडला, मात्र यापूर्वी त्याने तोतया पोलिस बनून किती गुन्हे केले याचा पोलिस शोध घेत आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात किती गुन्हेगार वाहनांवर ‘पोलिस’ लिहून वावरत असतील, गुन्हे करत असतील याचा शोध घेण्याची आता वेळ आली आहे. 

पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असते. त्या कामात अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस कर्मचारी वाहनांवर ‘पोलिस’ असे लिहितात. वाहनांवरूनच त्यांची ओळख स्पष्ट होत असल्यानेही नागरिकही त्यांना सन्मान देतात. मात्र आजकाल महाविद्यालयच नव्हे तर शाळेतली मुलेही मोठ्या प्रमाणावर वाहने घेऊन येतात. त्यातील अनेक वाहनांवर ‘पोलिस’ असे लिहिलेले असते. अशा वाहनावरून वावरणाऱ्या विद्यार्थ्याच्या घरात कोणीतरी पोलिस खात्यात आहे, असे समजून त्याला सन्मानाची वागणूक दिली जाते. पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांवर ‘पोलिस’ लिहिण्याची परवानगीच नसल्याचे नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दृष्टिक्षेपात - (मार्च २०१८ अखेर)
पोलिस कर्मचारी - ३१००
मोटारसायकल - ८,७५,२०६
मोपेड - ५७,४२७

वाहनांच्या नंबर प्लेटवर कोणतेही अक्षर, नाव लिहिण्यास बंदी आहे. वाहनधारकाने नंबर प्लेटवर आपल्या विभागाचे, खात्याचे नाव लिहिल्यास त्यावर कारवाई केली जाईल. याबाबत संबधित विभागाने खबरदारी घ्यावी. 
- डॉ. स्टीव्हन अल्वारिस, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com