अकरावी प्रवेशासाठीची तिसरी गुणवत्ता यादी लावण्याचा 'या' महाविद्यालयाने दिला नकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

तिसरी गुणवत्ता यादी लावण्याची गरज नसल्याचे ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयाने स्पष्टपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला सांगितले आहे.

सोलापूर - अकरावी प्रवेशासाठीची तिसरी गुणवत्ता यादी आज सकाळी
शहर-जिल्ह्यातील महाविद्यालयांनी आपल्या माहिती फलकावर लावली. तिसरी गुणवत्ता यादी लावण्याची गरज नसल्याचे ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालयाने स्पष्टपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला सांगितले आहे.

त्याठिकाणी शिल्लक असलेल्या जागेवर व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देण्यात येतील, असेही त्यांनी शिक्षण विभागाला कळविले आहे. विज्ञान शाखेसाठी वालचंद महाविद्यालयात 85.80 तर दयानंद महाविद्यालयात
73.60 इतके कट ऑफ झाले आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या
विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे, त्यांनी उद्यापर्यंत (मंगळवार) संबंधित
महावद्यिालयात जाऊन आपला प्रवेश निश्‍चित करायचा आहे. शेवटची यादी जाहीर झाल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी उद्या (मंगळवार) शेवटचा दिवस आहे.
त्यादिवशी ज्यांना प्रवेश घेता आलेला नाही व ज्यांचा तिसऱ्या यादीमध्ये
नंबर लागला आहे, अशा विद्यार्थ्यांना एकच दिवस प्रवेश घेण्यासाठी मिळणार आहे.

महाविद्यालयांची उद्या बैठक -
शहरातील प्रमुख महाविद्यालयांची बैठक बुधवारी (ता. 11) दुपारी दोन वाजता वालचंद महाविद्यालयात होणार आहे. या बैठकीत कोणत्या महाविद्यालयात किती जागा रिक्त आहेत, याची माहिती शिक्षण विभाग घेणार आहे. या बैठकीला कनिष्ठ सहायकांनी संपूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.

बुधवारी कोणत्या महाविद्यालयात किती जागा रिक्त आहेत, याची माहिती शिक्षण विभागाला मिळेल. त्यानंतर सोमवारी (ता. 16) प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांची बैठक घेतली जाणार आहे. विद्यार्थी व प्राचार्यांची बैठक घेऊन समोरासमोर प्रवेशाचा विषय मार्गी
लावला जाईल.
- मिलिंद मोरे, सहायक शिक्षण उपनिरीक्षक.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The third list for eleventh admission in Solapur has been announced