तिसऱ्या दिवशीही काम ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

लिपिकांचे आंदोलन - ४०२ लिपिक संपात सहभागी

सांगली - जिल्हा परिषद, पंचायत समितींतील लिपिकांनी मागण्यांसाठी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे आज तिसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प राहिले. १५ जुलैपासून लेखणी बंद आंदोलन सुरू आहे. 

४३६ पैकी ४०२ लिपिक संपात सहभागी झालेत. राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याच्या भूमिकेमुळे संघटना आजही ठाम होती. जिल्हाध्यक्ष सागर बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. खातेप्रमुख कामावर असूनही लिपिक नसल्यामुळे कामकाज ठप्प आहे. 

दिल्लीत प्रशिक्षण

केंद्राने स्वच्छ भारत अभियान मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना हागणदारीमुक्त प्रशिक्षणासाठी बोलावून घेतले. दिल्ली येथे दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी ते गेलेत. राज्यातील १० हागणदारीमुक्त जिल्ह्यात सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. त्याअंतर्गत मोहिमेला गती देण्यासाठी केंद्राकडून प्रशिक्षण आयोजित केले आहे. 

सीईओ भोसले २७ जुलैपासून मसुरीत

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले २७ जुलैपासून मसुरी येथे ४० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. आयएएस केडरमध्ये जाणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाकडून मसुरी येथे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा अन्य तत्सम पदावर पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा होतो. चार वर्षांत सांगलीत आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रुजू झाल्यानंतर अवघ्या चार-सहा महिन्यांत पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे झेडपीच्या कारभारात एकसूत्रीपणाच राहिलेला नाही. अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे पदभार हे चित्र पुन्हा पाहायला मिळणार आहे. डॉ. भोसले १२ सप्टेंबरनंतर सांगलीत परतणार आहेत.

Web Title: The third working day jam

टॅग्स