कळमजाई मंदीर परिसरातील पशु-पक्षांची भागणार तहान

हरिभाऊ दिघे
शनिवार, 16 जून 2018

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथून काही अंतरावर व निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या कळमजाई देवी परिसरातील बोअरवेल गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून हा बोअरवेल चालू केला असल्याने पशु-पक्षांची तहान भागणार आहे. घारगावपासून निसर्गाच्या कुशीत पांडव कालीन कळमजाई देवीचे भव्य असे मंदीर आहे. संपुर्ण परिसर निसर्गरम्य असल्याने औषधी वनस्पतींसह बिबटे, मोर, लांडोर, ससे, तरस आदी वन्यप्राणी व पशु-पक्षी याठिकाणी आढळतात. 

पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी येथे येत असतात. त्याचबरोबर देवीच्या शेजारुन पावसाळ्यात मोठा धबधबाही वाहत असतो. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी तसेच देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. देवीच्या मंदीरापासूनच काही अंतरावर बोअरवेल आहे. या बोअरवेलला पाणीही आहे. पण गेल्या काही दिवसांपासून बोअरवेल बंद अवस्थेत होता. त्यामुळे पाण्याअभावी पशु-पक्षांचे हाल होत असे.

बोअरवेल बंद अवस्थेत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर व घारगावचे माजी सरपंच दैवत आहेर या दोघांना समजताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बोअरवेलची पाहणी केली. बोअरवेल दुरुस्तीसाठी लागणारे सर्व साहित्य आणण्यात आले आणि नितीन आहेर यांनी स्वखर्चातून हा बोअरवेल दुरुस्त करुन चालू केला. या बोअरवेलचे पाणी पशु-पक्षांसाठी खड्डयातही सोडण्यात आले. 

त्यामुळे आता पशु-पक्षांची तहान भागणार आहे. यावेळी गोरक्ष पिसाळ, नवनाथ गाडेकर, संकेत आहेर, सतिश आहेर, राजेंद्र गाडेकर, ललित कान्होरे, पप्पु आहेर, मयुर गाडेकर, दत्तात्रय गाडेकर, तुकाराम गाडेकर, संतोष आहेर, अशोक मधे, वैभव आहेर, किशोर आहेर, नितीन कडाळे, राजेश आहेर आदी उपस्थित होते.

Web Title: Thirst for the animals and birds in the area of Kalamjai temple