esakal | जिल्हा प्रशासनामध्ये  तेरा "रावसाहेब' रुजू 
sakal

बोलून बातमी शोधा

Thirteen promotions increase in district administration

नायब तहसीलदारपदी बढती मिळालेले 13 कर्मचारी प्रशासकीय कामकाजासाठी नगर जिल्हा प्रशासनाकडे विभागीय आयुक्तांच्या आदेशाने वर्ग करण्यात आले. यापूर्वी नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदारपदी बढती मिळाल्याने बहुतांश ठिकाणी नायब तहसीलदारांची पदे रिक्त झाली होती.

जिल्हा प्रशासनामध्ये  तेरा "रावसाहेब' रुजू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन महसूल प्रशासनातील अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातील 13 कर्मचाऱ्यांना नाशिक विभागीय आयुक्तांनी "नायब तहसीलदार'पदी बढती दिली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी 13 जणांना जिल्हा प्रशासनातील नियुक्तीचा आदेश नुकताच दिला. त्यामुळे रिक्त जागी हे 13 "रावसाहेब' लवकरच रुजू होणार आहेत. 

नायब झाले तहसीलदार
नायब तहसीलदारपदी बढती मिळालेले 13 कर्मचारी प्रशासकीय कामकाजासाठी नगर जिल्हा प्रशासनाकडे विभागीय आयुक्तांच्या आदेशाने वर्ग करण्यात आले. यापूर्वी नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदारपदी बढती मिळाल्याने बहुतांश ठिकाणी नायब तहसीलदारांची पदे रिक्त झाली होती. या रिक्त पदांवर नव्याने बढती मिळालेल्या नायब तहसीलदारांना पदस्थापना देण्यात आली आहे. नियुक्तीच्या ठिकाणी संबंधित नायब तहसीलदारांना तत्काळ रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. 

अशी आहेत नावं
नायब तहसीलदार व नियुक्तीचे ठिकाण 
आर. व्ही. सासणे (नगर), पी. एल. तडवी (नगर), वाय. आर. कोतवाल (कोपरगाव), एम. एस. गोरे (कोपरगाव), व्ही. व्ही. खातळे (अकोले), एम. ए. माळवे (पारनेर), टी. डब्ल्यू. महाले (अकोले), व्ही. पी. वैद्य (शिर्डी), जे. आर. कारे (कर्जत), डी. डी. गोवर्धने (श्रीरामपूर), व्ही. के. सोमण (नगर), के. टी. महाले (जामखेड), के. एम. रंधे (राहाता

loading image