सातारा पासिंग गाडीत तीस लाखांच्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

सांगली - येथील वसंतदादा पाटील औद्योगिक वसाहतीमध्ये आज रात्री आठच्या सुमारास सातारा पासिंग असलेल्या "आय 20' गाडीत सुमारे 30 लाख रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या आहेत.

सांगली - येथील वसंतदादा पाटील औद्योगिक वसाहतीमध्ये आज रात्री आठच्या सुमारास सातारा पासिंग असलेल्या "आय 20' गाडीत सुमारे 30 लाख रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या आहेत.

संबंधित गाडीमध्ये जुन्या नोटा असल्याची माहिती मिळाल्यानंतर संजय नगर पोलिस ठाण्याच्या अधिकऱ्यांनी तपासणी केली. या वेळी सुमारे 30 लाख रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. पोलिसांनी गाडी व त्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. नोटा मोजण्याच्या यंत्राच्या साह्याने मिळालेल्या नोटा मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ताब्यात घेतलेल्या दोघांची माहिती अद्याप पोलिसांनी दिली नव्हती. त्यांच्याकडेही नोटांच्याबाबत चौकशी सुरू होती.

Web Title: thirty lakh receive in satara passing vehicle