मोहोळ : तालुक्यासाठी 30 हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

  • तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागाची रब्बी हंगामाची तयारी सुरू
  • मोहोळ तालुक्यातील पाणी स्तोत्रामुळे बागायत वाढले आहे
  • खतांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी

 

मोहोळ : मोहोळ तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागाने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली असून, तालुक्यासाठी 30 हजार मेट्रिक टन विविध रासायनिक खताची मागणी केल्याची माहिती, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. एन. माळी यांनी दिली.

मोहोळ तालुका तसा खरिपाचा परंतू उजनी डावा कालवा, आष्टी जलाशय, सीना नदी यासह अन्य पाणी स्तोत्रामुळे बागायत वाढले आहे. भीमा, जकराया व लोकनेते या तीन साखर कारखान्यामुळे उसाचे क्षेत्र वाढीस लागली आहे. तर द्राक्ष, डाळिंब, लिंबोनी, केळी, बोर आदी फळबागा चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्यामुळे वरिष्ठाकडे रासायनिक खतांची मागणी केली असल्याचे माळी यांनी सांगितले. रासायनिक खताच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांचा ती खरेदी करण्याकडे कल कमी झाला आहे. त्यामुळे गाव खताला पुन्हा मागणी वाढली आहे.

तालुका कृषी अधिकारी माळी यांनी शेतकऱ्यांना भेसळयुक्त खते मिळू नयेत, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी युरिया, डायअमोनियम फॉस्फेट, 15 15 15 व मॅग्नेशियम सल्फेट या खतांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच, संबंधित दुकानदार व कंपनी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

तालुक्यासाठी मागणी केलेली रासायनिक खते पुढीलप्रमाणे :

  • युरिया - 11 हजार मेट्रीक टन
  • डाय अमोनियम फॉस्पेट - 10 हजार 800 मेट्रीक टन 
  • म्यूरेट ऑफ पोटेश - 2 हजार 880 मेट्रीक टन 
  • सिंगल सुपर फॉस्पैट - 1 हजार 458 मेट्रीक टन 
  • अमोनियम सल्फेट - 200 टन 
  • कैलशिअम अमोनियम नायट्रेट - 153 मेट्रीक टन 
  • संयुक्त खते - 4 हजार मेट्रीक टन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirty thousand metric tonne chemical fertilizers demand for Mohol taluka