थोरातांनाही आवरेना "सेल्फी'चा मोह

thorat has taken selfie with wife marathi news
thorat has taken selfie with wife marathi news

संगमनेर : महसूलमंत्री झाल्यावर बाळासाहेब थोरात शनिवारी (ता.11) त्यांच्या मायभूमीत, जोर्वे येथे गेले. या वेळी गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. घरोघरी गुढ्या उभारून सडा-रांगोळी करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्‍यांची आतषबाजी करीत थोरात यांची पत्नी कांचन थोरात यांच्यासोबत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान थोरात यांनाही पत्नी कांचन यांच्यासोबत मोबाईलवर "सेल्फी' काढण्याचा मोह आवरता आला नाही. 

सत्काराला उत्तर देताना महसूलमंत्री थोरात म्हणाले, ""जन्मभूमी असलेल्या गावाची संस्कृती व संत सावलीतील संस्कार मी कायम जपले आहेत. प्रत्येक नागरिकाच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात विविध पदांवर काम करताना, तालुक्‍यातील जनतेने दिलेले भरभरून प्रेम कायम हृदयात आहे.'' 

युवराज चव्हाण कुस्तीत विजेता

दरम्यान, जोर्वे ग्रामस्थांतर्फे प्रेरणा दिनानिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुमारे 250 पहिलवानांनी भाग घेतला. त्यात युवराज चव्हाण याने बाजी मारली. पारितोषिक वितरणासाठी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कांचन थोरात, इंद्रजित थोरात, रणजितसिंह देशमुख, सुनंदा जोर्वेकर, सुरेश थोरात, रामहरी कातोरे, सरपंच रवींद्र खैरे, डॉ. सी. के. मोरे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com