त्या कोरोनाग्रस्तांनी उडवली अडीच हजार कुटुंबांची झोप, प्रशासन आहे पाळतीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

शहरात आढळून आलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण बरा होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे आतापर्यंतचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत. त्याचा अंतिम रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात येणार आहे. हा रिपोर्ट आज अथवा उद्या येण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं.

नगर  - जिल्ह्यात कोरोना विषाणूची बाधा झालेले तीन रुग्ण आढळून आलेले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अडीच हजार घरांवर महापालिकेची आठ पथके लक्ष ठेवून आहेत. या आठ पथकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वाहनांची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांत अजूनही कोरोनाबाबत गांभीर्य नाही.

नागरिकांनी या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स ठेवावा असे नगर महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी पत्रकार परिषदेत केले. 

यावेळी महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त प्रदीप पठारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे उपस्थित होते.

त्या तेवीसजणांच्या अहवालावर सर्वकाही

मायकलवार म्हणाले, मी महापालिकेत येऊन एक आठवडा आहे झाला आहे त्यामुळे अजून नगर शहराची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे मला सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. नगर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. यातील तिसरा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आली या 23 जणांची रक्त तपासणी अहवाल उद्या प्राप्त होतील. नागरिकांनी उगाच घाबरून जाऊ नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

शहरात आढळलेले तीन रुग्ण व त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्ती असे सुमारे अडीच हजार घरांवर महापालिका लक्ष ठेवून आहे. त्यासाठी महापालिकेने आठ पथके नियुक्त केली आहेत. यातील प्रत्येक पथकात एक डॉक्टर व चार परिचारिका आहेत. झोपडपट्टीसाठी वेगळे पथक नेमण्याचा विचार सुरू आहे.

रिकाम्या भूखंडात मिळणार भाजी
शहरातील महापालिकेच्या रिकाम्या भूखंडात भाजीवाल्यांसाठी जागा देण्यात येणार आहे. या भाजीवाल्यांना व ग्राहकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याची ताकीद देण्यात येणार आहे. नगर शहरातील सर्व प्रभागांत अशा पद्धतीने भाजीवाल्यांसाठी जागा देण्याचा विचार सुरू आहे.

किरकोळ दुकानदारपर्यंत पोहोचणार माल
शहरातील किरकोळ दुकानदारांचा माल संपत आलेला आहे तसेच ठोक व्यापाऱ्यांना माल किरकोळ दुकानदार आम पर्यंत पोहोचवता येत नाही अशी माहिती ठोक व्यापाऱ्यांनी महापालिकेला दिली असून महापालिकेच्या पुढाकारातून आठवड्यातून दोनदा किरकोळ दुकानदारांना माल पोहोचवण्याची व्यवस्था करून देण्याचा विचार सुरू आहे यावर उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे यासंदर्भात मार्केट कमिटी अध्यक्ष चर्चा करण्यात येत आहे

औषध फवारणीसाठी मदत
महापालिकेकडून नगर शहरात सोडियम हायड्रोक्लोराइड औषधाची फवारणी करण्यात येत आहे या यासाठी महापालिकेकडे पुरेशी वाहने नसल्यामुळे काही शेतकऱ्यांकडून औषध फवारणीसाठी ट्रॅक्टर घेण्याचा विचार सुरू आहे

बरा झालेला रुग्ण घरी जाणार
शहरात आढळून आलेल्या तीन रुग्णांपैकी एक रुग्ण बरा होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे आतापर्यंतचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत. त्याचा अंतिम रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात येणार आहे. हा रिपोर्ट आज अथवा उद्या येण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those coroners feared the lives of two and a half thousand families