"त्या' तीर्थक्षेत्राची वाट झाली हाऊसपुल्ल ! 

"Those 'pilgrimage crowds on the road
"Those 'pilgrimage crowds on the road

नगर : ""संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदी तीर्थक्षेत्राची वाट गजबजली आहे. उद्या (रविवारी) पुणे जिल्ह्यातील आळंदीला संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा समाधी उत्सव असल्यामुळे नगरची बसस्थानके आज हाउसफुल्ल झाली होती. नगर विभागातर्फे वारकऱ्यांच्या दिमतीला जिल्ह्यातून 60 जादा बसेस आळंदीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. 

भाविकांचा प्रवास त्रासदायक होऊ नये, म्हणून एसटी अधिकाऱ्यांकडून भाविकांच्या रांगा करून त्यांना बसमध्ये बसवण्यात येत होते. माळीवाडा बसस्थानकामध्ये जिल्ह्यातील इतर भागांतून येणाऱ्या भाविकांना तारकपूर, स्वस्तिक बसस्थानकातून आळंदीकडे रवाना केले. 
जीवनाचा आचारधर्म सांगणारा विचार ज्ञानोबारायांनी दिला. आळंदी येथेच ज्ञानेश्‍वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. त्या सोहळ्याला संत नामदेव महाराज आदी तत्कालीन संत उपस्थित होते. याच सोहळ्यासाठी वारकरी आळंदी वारीसाठी निघतात. या वारीसाठी मागील दोन दिवसांपासून शहरातील बसस्थानके हाउसफुल्ल झाली आहेत. सोमवारी (ता. 25) वारकऱ्यांची गर्दी कायम राहणार आहे. 

जिल्ह्यात अकरा आगारात साडेचार हजार कर्मचारी सेवा बजावतात. साडेसातशे बसेसच ताफा प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. राज्यातील कोट्यवधी प्रवाशांचा आधार लाल परी ठरली आहे. अनेक स्वागातार्ह बदलही एसटी महामंडळाने केले आहेत.

एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातात्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. प्रवासाचे हमखास आणि विश्‍वसनीय साधन म्हणून एसटी महामंडळाकडे पाहिले जाते. प्रवाशांचा विश्‍वास एसटीने कमवला आहे. आजही खासगी वाहन टाळून एसटीनेच प्रवास करण्याकडे लोकांचा ओढा असतो. 

सीसीटीव्हीचा वॉच 
भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यंदा एसटी प्रशासनाने भाविकांच्या साहित्याची चोरी होऊ नये, यासाठी सर्व भाविकांना रांगेत उभे करून बसमध्ये बसून दिले जात आहे. यासाठी सुरक्षारक्षक, सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला. यासाठी सर्व अधिकारी तारकपूर बसस्थानकात लक्ष ठेवून आहेत. 

वारकऱ्यांच्या सुखकर वारीसाठी बांधील 
आळंदी वारीसाठी जिल्ह्यातील वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी अकरा आगारांतून 60 बसेसचा ताफा वारकऱ्यांच्या दिमतीला ठेवण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या सुखकर वारीसाठी एसटी महामंडळ बांधील आहे. 
- विजय गिते, विभागनियंत्रक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com