'जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात जावे : मंत्री बेग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नवीन कायद्याची भीती घालून कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी केली जात आहे. घटनात्मक अधिकार हिरावून घेण्यात येत आहे. त्यामध्ये आता सीमाभागातील मराठी भाषिकांना जय महाराष्ट्र म्हणण्यास रोखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

बेळगाव - जय महाराष्ट्र म्हणणाऱ्याचे नागरसेवक पद रद्द करण्याचा इशारा देणारे कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी आज (मंगळवार) पुन्हा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. जय महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात जावे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

नवीन कायद्याची भीती घालून कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी केली जात आहे. घटनात्मक अधिकार हिरावून घेण्यात येत आहे. त्यामध्ये आता सीमाभागातील मराठी भाषिकांना जय महाराष्ट्र म्हणण्यास रोखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

या वादग्रस्त विधानाचे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कर्नाटक सरकार व कन्नड विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करणारा नवा कायदा लवकरच संमत केला जाईल, असे बेग यानी सोमवारी म्हटले होते. कर्नाटकविरोधात घोषणा व अन्य राज्यांचा जयजयकार करणाऱ्या नगरसेवकांना यामुळे चाप बसेल, असे स्पष्ट केले होते.

Web Title: Those who say 'Jai Maharashtra' should go to Maharashtra: Minister Beg