खड्ड्यातून प्रवास करणाऱ्यांना मिळाले गुलाबपुष्प व मानपत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

शहर व परिसरात माेठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने कऱ्हाडकरांनी अनाेख्या पद्धतीने आंदाेलन छेडले.

कऱ्हाड : दक्ष कऱ्हाडकरच्या या व्हॉटस्‌ ग्रुपच्या माध्यमातून एकत्रीत आलेल्या कऱ्हाडातील युवकांनी व अन्य ग्रुप सदस्य तसेच नागरीकांनी आज (गुरुवार) कऱ्हाडमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खडड्‌यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विजय दिवस चौकात अभिनव आंदोलन केले.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कऱ्हाडमधील कार्वे नाका रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यातून सुरक्षीत प्रवास केल्याबद्दल आंदोलनकर्त्यांकडून चालकास मानपत्र व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.

या मानपत्रात आपण शेकडो खड्ड्यातून सुरक्षीत प्रवास केल्याबद्दल तुमचा सन्मान करण्यात येत आहे असे नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनास नागरीकंनीही चांगला प्रतिसाद दिला. या रस्त्यावरुन जाताना नागरीक आवर्जुन थांबत होते. रस्त्याची स्थितीबाबत नाराजी व्यक्त करीत होते.


या आंदोलनादरम्यान रस्त्यावरुन जाणाऱ्या शासकीय वाहनांवरील चालकांना देखील आंदोलनकर्ते गुलाबपुष्प देत होते. हे अनोख्या पद्धतीच्या आंदोलनाचे कऱ्हाड शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. 

हेही वाचा ः ...या शहरात जन्मणारी मुलगी ठरणार लखपती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those Who Traveled From Potholes Received Roses And Letter Of Honor