साताऱयात पहाटे पर्यंत धावणार हजाराे धावपटू

साताऱयात पहाटे पर्यंत धावणार हजाराे धावपटू

सातारा : एएफएसएफ फौंडेशन आयोजित एएफएसएफ सातारा नाईट मॅरेथॉन येत्या शनिवारी (ता.एक जून) होत असून यामध्येदेशातील 2500 धावपटू सहभागी झाले आहेत. यंदाच्या साडे तीन किलोमीटरची धमाल रन ही या मॅरेथॉनचे वैश्‍ष्ठिय आहे. देशभरातून येणाऱ्या धावपटूंना स्पर्धा मार्गावर सातारकरांनी प्रोत्साहित करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 


ही मॅरेथॉन 10,21 आणि 42 किलोमीटर अशी आहे. मुख्य मॅरेथॉनला रात्री दहा वाजता छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलातून प्रारंभ होईल. तेथून धावपटून गणपतराव तपासे मार्गे (राधिका रस्ता), गोराराम मंदिर , मोती चौक, राजवाडा , समर्थ मंदिर, अदालत वाडा मार्गे छत्रपती शाहू महाराज चौक, तालीम संघ , राजपथ, कमानी हौद , मोती चौक , 501 पाटी , पोलीस मुख्यालय, पोवई नाका मार्गे जिल्हा रुग्णालय, हॉटेल ग्रीनफिल्ड , अजिंक्‍य हॉस्पिटल , बांधकाम भवन, जिल्हा परिषद , विसावा नाका , बॉम्बे रेस्टॉरंट , मीनाक्षी हॉस्पिटल असे धावतील. पहाटे चार वाजता मॅरेथॉनचा समारोप होईल. ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी सातारा पोलीस व सातारा पालिकेचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे संयोजकांनी नमूद केले.

साताऱ्याचे नाव मॅरेथॉन सिटी असे प्रसिद्ध झाले आहेच. त्याच बरोबर महाराष्ट्राची पहिली आणि देशातील दुसरी अशी नाईट मॅरेथॉन घेण्याचा सन्ममान ही साताऱ्याने मिळविला आहे. गतवर्षी दोन जूनला साताऱ्यात महाराष्ट्र राज्यातील पहिली नाईट मॅरेथॉन संपन्न झाली. दिल्ली, दार्जलिंग, बंगळूर, चेन्नई , हैद्राबाद , गोवा अशा देशभरातून 2500 धावपटूंनी साताऱ्याच्या नाईट मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला होता. या नाईट मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे ही मॅरेथॉन देशातील पहिली कस्टमाइज्ड मॅरेथॉन ठरली आहे. ज्यामध्ये प्रत्येक धावपटूच्या प्रत्येक पदकावर व टीशर्टवर त्याचे नाव असते. याबरोबर ही 10,21 आणि 42 किलोमीटरची साताऱ्यातील पहिली फुल मॅरेथॉन असल्याचाही मान या मॅरेथॉनने पटकावला आहे. साताऱ्यात गेले तीन वर्ष सातत्याने स्पोर्टस आणि फिटनेसच्या क्षेत्रात कार्यरत असणारी एएफएसएफ फौंडेशन ही संस्था लिव्ह फिअरलेस हे ब्रीद वाक्‍य घेऊन विशेषतः महिला आरोग्य व सुरक्षाच्या दिशेने एक वाटचाल म्हणून या नाईट चॅलेंजर मॅरेथॉनचे आयोजन करीत आहे. त्यांच्या ह्या कार्याची नोंद घेऊन एचडीएफसी सातारा, कूपर उद्योग समूह, एसएसई इंडिया, लायन्स, रोटरी अशा संस्थांनी संस्थेच्या सन्मान केल्याचे संयोजकांनी नमूद केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com