महापुरात हजारो दुचाकी झाल्या खराब... 

Flood damaged Two Wheeler
Flood damaged Two Wheeler

सांगली/कोल्हापूर : पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी इतक्या झपाट्याने वाढले की, सावरायला वेळच मिळाला नाही. बघता बघता पाणी घरात आले. जीव वाचविण्याच्या धांदलीत दारासमोर उभ्या केलेल्या दुचाकी पाण्यात बुडाल्या. अशा सुमारे 10 हजार दुचाकींमध्ये पाणी गेले असून त्यांच्या दुरुस्तीसाठी आता सांगली, कोल्हापूरकरांनी गॅरेजमध्ये गर्दी केली आहे. पण, एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या दुचाकी दुरुस्त करण्यासाठी मेस्त्री अर्थात फिटरच उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती उद्भवली आहे.

बऱ्याच लोकांना वाटले, दारात आलेले पाणी एवढे काही वाढणार नाही. त्यामुळे वाहने सुरक्षित ठिकाणी हलवायची राहूनच गेली. परिणामी ती पूर्णपणे बुडाली. आता दुरुस्तीसाठी या दुचाकींनी गॅरेजच्या गर्दीत वाट बघत बसावी लागणार आहे. येथे दुचाकी दुरुस्तीसाठी नंबर लावावे लागत आहेत. दुचाकी दुरुस्तीसाठी किमान एक ते तीन हजार रुपयांचा खर्च येत आहे.
 

पुरातून बाहेर पडल्यानंतर लोकांनी घरे सावरली आहेत. आता वेळ आहे दुचाकी, टीव्ही, फ्रीज दुरुस्तीची. त्यात आधी नंबर दुचाकीचा. कारण, दुचाकी नसेल तर पाय नसल्यासारखी अवस्था होते. मेस्त्रींकडे नंबर लावून काम सुरू आहे. आधी धुलाई आणि मग शिलाई, अशी अवस्था आहे. प्रचंड नुकसान झाले आहेत. जुन्या दुचाकींचे तर बोलायला नको. इतकी कामे निघू लागलीत की, गाडी नवीच घेतलेली बरी, अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे. नवी दुचाकी खरेदी केलेल्यांनी शोरुम गाठले आहेत. तेथे विमा संरक्षणासाठी धावाधाव सुरू झाली आहे. 

दुचाकीला फटका 
* ऑईल, फिल्टर पूर्ण खराब 
* प्लग बदलणे आवश्यकच 
* सायलेन्सर काढून स्वच्छता 
* वायरिंग खराब, बदलणे गरजेचे 
* इंजिन ऑईलची सातत्याने बदली हवी 
* नवी दुचाकी घेणे परवडले एवढा खर्च
* विम्यासाठी धावाधाव सुरू 

“दुचाकी दुरुस्त करून पुन्हा सुरू व्हायला किमान एक हजार रुपये खर्च आहे. शिवाय पुढील दोन-चार ऑईल बदली या एक-दोनवेळा चार-चार दिवसांनी करून घ्याव्या लागतील.” 
- गणी शेख, प्रदीप इंगळे, दुचाकी गॅरेज मालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com