हल्लाबोल सभेसाठी हजारो युवक पुण्याकडे रवाना

राजकुमार थोरात 
रविवार, 10 जून 2018

वालचंदनगर : पुण्यामध्ये आज (रविवार ता.१०)  होणाऱ्या हल्लाबोल सभेसाठी हजारो युवक पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आराेग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरमधून पुण्याकडे रवाना झाले.

वालचंदनगर : पुण्यामध्ये आज (रविवार ता.१०)  होणाऱ्या हल्लाबोल सभेसाठी हजारो युवक पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आराेग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरमधून पुण्याकडे रवाना झाले.

आज (रविवार ता.१०) रोजी पुण्यामध्ये सायंकाळी चार वाजता हल्लाबोलची जाहीर सभा होणार आहे.  हल्लाबोल यात्रेमध्ये तालुक्यातील जास्तीजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी मागील आठवड्यामध्येच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये बैठक घेतली होती. अाज सकाळी इंदरापूरहुन हजारो नागरिक चारचाकी वाहनाने पुण्याकडे रवाना झाले. यामध्ये युवकांची संख्या लक्षणीय होती.  पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषदेच्या गटातील व तालुक्यातील अनेक गावातील शेकडो युवकांना पुण्यामध्ये जाण्यासाठी नियोजन केले होते.  

सर्व युवक पुणे-सोलापूर महामार्गावरील पळसदेव मध्ये एकत्र जमली होते .सर्वांनी एकत्र पुण्याकडे दुपारी साडेबारच्या सुमारास  २२५ चारचाकी वाहनासह पुण्याकडे प्रस्थान केले. चारचाकी गाड्यामध्ये  एकत्र निघाल्यामुळे पुणे -सोलापूर महामार्ग गाड्यांची गर्दीचे दृष्य पाहण्यासारखे होते.

 

Web Title: thousands of youths leave for Pune for hallabol rally