विषारी दारू प्रकरणी सूत्रधारासह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

नगर: पांगरमल (ता. नगर) येथे सात बळी घेण्यास कारणीभूत ठरलेली विषारी दारू पुरविणाऱ्या मुख्य सूत्रधारासह तिघांना आज नांदेड पोलिसांनी अटक केली. त्यांना नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सूत्रधार मोहन श्रीराम दुग्गल, संदीप मोहन ऊर्फ सोनू दुग्गल (रा. गजानन कॉलनी, सावेडी) व शेखर जाधव (रा. तारकपूर) अशी त्यांची नावे आहेत.

बनावट दारूच्या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी भीमराज आव्हाड, जितू गंभीर, जाकीर शेख यांना अटक केली आहे. मोहन दुग्गल व त्याचा मुलगा सोनू पसार होते. पोलिस चार दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. ते नाशिकला गेल्याची माहिती पोलिसांना आधी मिळाली. त्यानंतर दोन दिवसांपासून कल्याण-उल्हासनगर परिसरात पोलिस पथक गस्त घालत होते. या पथकाला आरोपीच्या एका महिला नातेवाइकाकडून दुग्गल पिता-पुत्र व जाधव नांदेडला गेल्याचे समजले.

नांदेडमधील एका धार्मिक स्थळात तिघे लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेला कळविले. त्यानुसार नांदेड पोलिसांनी सापळा रचून पहाटे आरोपींना अटक केली. नगरच्या पोलिसांनी तेथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांचे वाहन पोलिसांनी जप्त केले.

Web Title: Three arrested in toxic alcohol case

टॅग्स