बेळगावजवळ तीन मुले बुडाली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

उचगाव - गावाशेजारी असलेल्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. ८) दुपारी ३.३० च्या सुमारास मण्णूरजवळ घडली. कुशन कल्लाप्पा चौगुले (वय १०), साहिल मनोहर बाळेकुंद्री (१४) व आकाश कल्लाप्पा चौगुले (१४, तिघेही रा. मरगाई गल्ली, मण्णूर, ता. बेळगाव) अशी मृत मुलांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, वार्षिक परीक्षा संपल्याने शाळांना सुटी लागली आहे. सुटीचा आनंद लुटण्यासाठी मरगाई गल्लीतील पाच शाळकरी मित्र मण्णूर-गोजगा गावच्या मधोमध असलेल्या खाणीत पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पोहता येत नव्हते. त्यासाठी त्यांनी घरातील पाच लिटर क्षमतेचे प्लास्टिकचे रिकामी कॅन नेले होते. दुपारी तीनच्या सुमारास आकाश, साहिल व कुशन खाणीच्या काठावर कपडे व बूट उतरवून तसेच प्लास्टिक कॅन पोटाला बांधून खाणीत पोहण्यासाठी उतरले. खाणीच्या मध्यभागी गेल्यानंतर पोटाला बांधलेले डबे सुटल्याने ते बुडू लागले. त्यामुळे, त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी खाणीच्या काठावर त्यांचे लहान मित्र बसले होते. त्यांनाही पोहता येत नव्हते. आपले मित्र बुडत असल्याचे पाहून त्यांचीही घाबरगुंडी उडाली. त्यांनी गावात जाऊन घरच्यांना या घटनेबाबत माहिती दिली. 

काही वेळातच गावातील शेकडो लोक घटनास्थळी पोचले. अग्निशामक दलालाही कळविण्यात आले. काही तरुणांनी खाणीत उडी घेऊन बुडालेल्या तिघांचा शोध सुरू केला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिन्ही मुले बुडून मृत झाली होती.

Web Title: three children drown