कसबा सांगावला तीन मगरींचा वावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

कसबा सांगाव - कसबा सांगाव येथील दूधगंगा नदीपात्रात सुळकूड बंधाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर तीन मगरींचा वावर असल्याचे शेतकऱ्यांना आढळून आले आहे. या मगरींचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून वनविभागाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. सूळकड बंधाऱ्याच्या पश्‍चिम बाजूला साधारण एक किलोमीटर अंतरावर आनंदा विश्‍वनाथ माळी यांच्या शेताच्या परिसरात या मगरींचा वावर आहे. काही दिवसापासून मगर दोन पिलांसह नदीपात्रात निदर्शनास येत आहे. परिसरात अनेक पाणीपुरवठा संस्थांचे जॅकवेल आहेत.

कसबा सांगाव - कसबा सांगाव येथील दूधगंगा नदीपात्रात सुळकूड बंधाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर तीन मगरींचा वावर असल्याचे शेतकऱ्यांना आढळून आले आहे. या मगरींचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून वनविभागाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. सूळकड बंधाऱ्याच्या पश्‍चिम बाजूला साधारण एक किलोमीटर अंतरावर आनंदा विश्‍वनाथ माळी यांच्या शेताच्या परिसरात या मगरींचा वावर आहे. काही दिवसापासून मगर दोन पिलांसह नदीपात्रात निदर्शनास येत आहे. परिसरात अनेक पाणीपुरवठा संस्थांचे जॅकवेल आहेत. मोठ्या प्रमाणात गवत, झाडे-झुडुपे, बेटाची झाडे, उसाची शेती असल्याने शेतकरी शेतीच्या कामासह जनावरांना चारा आणण्यास, मशागत करण्यासह पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी या परिसरात येत असतात. नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने दुपारच्या सुमारास या मगरींचा वावर पात्राच्या बाजूला दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाकडून याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

 

Web Title: Three crocodile found in Kasba Sangav