पसार महाराष्ट्र केसरी चंद्रहारला पकडण्यासाठी तीन दिवसाची डेडलाईन....अन्यथा काय?

chandrahar patil.JPG
chandrahar patil.JPG

सांगली- वाळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा, या कारणावरून विटा (जि. सांगली) येथे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना गाडीतून ओढून मारहाण केल्या प्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याला अटक व कारवाईच्या मागणीसाठी महसुल कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून काम केले. तीन दिवसांत कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने आज दिला. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. 


डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व सोबत असलेल्या एका अनोळखीने रविवारी (ता. 3) दुपारी दीडच्या सुमारास तहसीलदार शेळके यांना वाळूच्या वाहनांवर केलेल्या कारवाईचा रोष मनात ठेवून तहसील कार्यालयाच्या पोर्चमध्ये मारहाण केली. तो सोमवारी पसार झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी महसुल कर्मचाऱ्यांवर हात उचलणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

महसूल कर्मचारी संघटनेने त्याचा निषेध म्हणून आज काळ्या फिती लावून काम केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, एस. आर. बर्गे, गणेश मरकड, समीर शिंगटे, बाबासाहेब वाघमोडे, डॉ. विजय देशमुख आदींच्या सह्यांचे निवेदन संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com