बेळगाव : पुरात अडकलेल्या दाम्पत्यांचा तीन दिवस झाडावरच आश्रय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

बेळगाव - पुरात अडकलेल्या दाम्पत्याने तब्बल 3 दिवस झाडावर आश्रय घेतल्याची धक्कादायक माहिती बेळगाव तालुक्यातील कबलापूर गावात आज (ता.8) उघडकीस आली आहे. गुरुवारी (ता.8) दाम्पत्याला अग्निशमक दलाच्या जवानांनी मदतीचा हात देत सुखरूप बाहेर काढले.

कबलापूर येथे नाल्याजवळ काडप्पा व रत्नाव्वा नामक दाम्पत्य वास्तव्य करत असून त्यांच्या घराजवळ तीन दिवसापूर्वी  मंगळवारी (ता.6) सायंकाळी अतिवृष्टी होऊन पुरस्थिती निर्माण झाली. दाम्पत्याच्या घरात पाणी घुसल्याने हे दोघेही घराजवळील झाडावर चढून बसले. त्यांना वाटले पाऊस कमी होईल आणि परत घरी जाता येईल. पण, तब्बल तीन दिवस पावसाने उसंती घेतली नाही. पाण्याची पातळी वाढतच राहिली. यामुळे तीन दिवसांपासून जोडपे झाडावर आश्रय घेत होते. आज त्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाल्यानंतर अग्निशमक दलाची मदत घेऊन दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three days they stay on tree in flood situation in Belgaum