नगर-पुणे महामार्गावर अपघातात तीन जण ठार

accident
accident

पारनेर : नगर-पुणे महामार्गावर आज (ता.11) पहाटे उभ्या माल ट्रकवर पाठीमागून आलेली जीप जोरदार आदळून झालेल्या अपघातात धुळ्याचे तीन ठार झाले तर इतर एक गंभीर जखमी झाला.

आज पहाटे साडेचार वाजनेच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या जीपची जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रक (क्र.MH 22 AA 524) वर जीप (स्कार्पिओ क्र. MH 18 AJ 8443 ) ही पाठीमागून येऊन जोराची धडक दिल्याने यात जीपमधील तीन जण जागीच ठार तर एक जखमी झाला.

त्यांची नावे अशी ओझायर तसनीय  अख्तर अन्सारी (वय-30)  रा.फिरदोस नगर,धुळे, 
फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-20 )रा.मछली बाजार धुळे, इरफान शयशोदोहा अन्सारी (वय-20) रा.मछली बाजार धुळे व जखमी अदनान निहाल अन्सारी (वय-21) (रा.तिरंगा चौक ,धुळे) तीन जण मयत व एक जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झालेले आहेत.जखमींना तात्काळ उपचारासाठी पाठवले असून मयत पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत.या बाबतची फिर्याद जुनेद यांनी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com