ईदचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या तिघांचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

करमाळा - ईदचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील तिघांचा आज करमाळा येथे मोटार (एमएच 19 बीयू 9856) 50 फूट खोल कालव्यात पडून अपघाती मृत्यू झाला. नगर- टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गावर कुंभेज फाटा (ता. करमाळा) येथे पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील तिघेही मृत जळगाव जिल्ह्यातील आहेत.

फारूक शेख (वय 62), फरहान खान (वय 23, दोघेही रा. इस्लामपूर, जि. जळगाव), तहेरीम हरीश जफर महमंद शेख (वय 22, रा. कोर्ट मोहल्ला, जि. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. रमजान ईदचा सण झाल्यानंतर सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी शेख कुटुंबीय दोन वाहनांतून जामनेर (जि. जळगाव) येथून गोव्याला निघाले होते. औरंगाबाद येथे जेवण केल्यानंतर पुढे जात असताना पाऊस पडत होता. कुंभेज फाटा (ता. करमाळा) येथे पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी पुलाचा कठडा तोडून थेट कालव्यामध्ये पडली. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. करमाळा पोलिसांनी मृतदेह तत्काळ बाहेर काढले आहेत.

दुसऱ्या वाहनातून पुढे गेलेल्यांना अपघात झाल्याचे कळले नाही. ते पंढरपूरपर्यंत गेले होते. मृत फारूक यांच्या खिशातील मोबाईलवरून पोलिसांनी त्याने केलेल्या कॉलवर फोन केल्यानंतर त्यांना अपघाताची माहिती समजली.

Web Title: three death in accident