राज्यात डेंगीमुळे तीन जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मुंबई - डेंगीने आठवडाभरात राज्यात तिघांचा बळी घेतला आहे. 317 नवीन रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून डेंगीच्या 5 हजार 137 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चिकुनगुन्याचे 377 नवीन रुग्ण आढळले आहेत.

राज्यात 8 ते 14 ऑक्‍टोबर या काळात डेंगीने तिघांचा बळी घेतला. राज्यात या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या 16 वर पोहचली आहे. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. एक ते सात ऑक्‍टोबर या काळात हा आजार झालेले 407 रुग्ण आढळले होते.

चिकुनगुन्याच्या 1 हजार 143 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 8 ते 14 ऑक्‍टोबरपर्यंत आढळलेल्या चिकुनगुन्याच्या 377 रुग्णांपैकी पुणे महापालिका क्षेत्रात 371 रुग्ण आढळले आहेत. राज्यात चिकुनगुन्याच्या एकाही मृत्यूची नोंद नाही.

Web Title: three death by dengue