शिर्डीत तिहेरी हत्याकांड; एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

नगर : शिर्डी येथील कातोरे वस्तीवर किरकोळ कारणावरून आज सकाळी एकाने तिघांची कोयत्याने वार करून हत्या केली, तर इतर तिघांना गंभीर जखमी केले आहे.

नगर : शिर्डी येथील कातोरे वस्तीवर किरकोळ कारणावरून आज सकाळी एकाने तिघांची कोयत्याने वार करून हत्या केली, तर इतर तिघांना गंभीर जखमी केले आहे.

नामदेव भिका ठाकूर (वय 62), दगुबाई नामदेव ठाकूर (वय 56), खुशी सुनील ठाकूर (वय 16)  अशी मृतांची नावे आहेत. या हल्ल्यात महिमा सुनील ठाकुर ( वय 18), प्रिती राजेंद्र ठाकूर, राजेंद्र भिक्का ठाकूर ( सर्व रा. कातोरे वस्ती शिर्डी) हे जखमी झाले असून उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. 

ही घटना किरकोळ कारणावरून झाल्याचे पोलिस सूत्रांकडून समजले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अर्जुन पन्हाळे (वय 50, रा. कातोरे वस्ती शिर्डी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three deaths were reported from the same family in Shirdi

टॅग्स