दोन भावांसह तिघांचा खाणीमध्ये बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

श्रीरामपूर - उन्हाळी सुटीनिमित्त मामाकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांसह त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मामीचा वळदगाव येथे खाणीतील पाण्यात बुडून आज दुपारी मृत्यू झाला. ओंकार दादासाहेब डुकरे (वय 10) व शुभम दादासाहेब डुकरे (वय 12, दोघेही रा. शिरोली, ता. जुन्नर, जि. पुणे), कविता गणेश खंडागळे (वय 28, रा. वळदगाव, ता. श्रीरामपूर) अशी मृतांची नावे आहेत. 

उन्हाळी सुटीनिमित्त ओंकार व शुभम वळदगाव येथील मामा गणेश खंडागळे यांच्याकडे आले होते. जनावरांना पाणी पाजण्यासाठी दुपारी खटकळी येथील दगडाच्या खाणीत मामी कविता खंडागळे यांच्यासोबत गेले होते. खाणीत उतरताना त्यातील एक जण पाय घसरून पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी भाऊ व मामी कविता धावले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या आरती गणेश खंडागळे (वय 5) हिने आरडाओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वळदगावचे पोलिस पाटील शिवाजी भोसले यांनी तरुणांच्या मदतीने तिघांना बाहेर काढले. परंतु तिघांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: three die drowning in the mine

टॅग्स