शिराळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

बिळाशी - मांगरूळ (ता. शिराळा) येथील खवरे वस्तीमध्ये शेतकरी किसन लक्ष्मण खवरे यांच्या राहत्या घराच्या काही अंतरावर असणाऱ्या जनावरांच्या शेडमधील तीन शेळ्यांवर शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून शेळ्यांना ठार मारले. तसेच शेजारीच असणाऱ्या बैलाच्या डाव्या कानावर बिबट्याने पंजा मारून त्यास जखमी केले. 

हल्ल्यादरम्यान शेळ्यांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे किसन खवरे, बंधू रंगराव खवरे, बजरंग खवरे, राजेंद्र खवरे यांनी शेडकडे धाव घेतली असता त्यांना प्रत्यक्ष तीन बिबटे दिसले. त्या बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. या घटनेची माहिती वन विभागाला कळताच बिळाशी वन विभागाचे वनपाल पी. एन. पाटील, वनरक्षक मारुती पाटील, तानाजी खोत, तलाठी उत्तम कांदेकर घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता बिबट्यांच्या पायांचे ठसे वन अधिकाऱ्यांना आढळून आले. मांगरूळ, शिंदेवाडी, बेलेवाडी या परिसरांतील भरवस्तीतील हा तिसरा हल्ला असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

Web Title: Three goats killed in leopard attack in Sangli District