काळवीट शिकाऱ्यांचे तीनशे मीटर जाळे जप्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

सोलापूर : कारंबा, मार्डी परिसरात काळवीट शिकारीसाठी लावण्यात आलेले तीनशे मीटर लांबीचे जाळे नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी जप्त केले. घटनास्थळावरून शिकारी पसार झाले. 

माहिती मिळाल्यानंतर नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. शिकारी जाळे टाकून पसार झाले. काळवीट आणि अन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेले तीनशे मीटर लांबी आणि दहा फूट उंचीचे जाळे जप्त करण्यात आले. वन विभागाला याबाबतची माहिती कळविण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरवातीला टाळाटाळ केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर वन कर्मचारी उशीरा घटनास्थळी दाखल झाले. 

यावेळी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत छेडा, पप्पू जमादार, बालाजी चंद्रबन्सी, सोमानंद डोके, दाजी क्षिरसागर, दाऊत शेख, सारंग म्हमाणे, किरण कांबळे, संतोष धाकपाडे व महादेव डोंगरे आदी उपस्थित होते.

Web Title: Three hundred meters of blackbuck hunters net seized