पुणे-बंगळूर महामार्गावर अपघातात तीन जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

सर्व जण कोल्हापूर येथील रहिवासी असून जखमींची नांवे समजू शकली नाहीत. नागरीकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

उंब्रज (ता. कऱ्हाड, जि. सातारा) : शिवडे ता.कराड गावचे हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला चारचाकी गाडीने पाठीमागून दिलेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज (रविवार) सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास घडली आहे. 

याबाबत घटनास्थळावरून माहिती अशी की, शिवडे ता.कराड गावचे हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला फोर्ड इंडीवर कंपनीची चारचाकी गाडी क्र. एम. एच. ०९ बी.एम. ३९१९ ने पाठीमागून धडक दिली. यामध्ये गाडीतील एक जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीमध्ये दोन पुरुष व एक महिला होते.

सर्व जण कोल्हापूर येथील रहिवासी असून जखमींची नांवे समजू शकली नाहीत. नागरीकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Web Title: three injured in accident on Pune-Bangalore highway