तलवार हल्ल्यात बलवडीत तिघे जखमी

तलवार हल्ल्यात बलवडीत तिघे जखमी

आळसंद - बलवडी भा. (ता. खानापूर) येथे शेटनेट भाड्याने देण्याच्या कारणावरून आज सायंकाळी सातच्या सुमारास तीन तरुणांवर तलवार हल्ला झाला. त्यात सूरज कमरुद्धीन मुलाणी (वय ३०), सयाजी यशवंत पवार (वय ३१), आलम बाबासो मुलाणी (वय २७, सर्व बलवडी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात सूरजला पाठीत, सयाजीला उजव्या हातावर वर्मी, तर आलम यास उजव्या बाजूच्या बरगडीत वर्मी वार लागला. हल्लेखोर पसार झाले. 

बलवडीत आज सायंकाळी दुचाकीवरून काही तरुणांचा जमाव गावात आला. त्यांनी वरील तिघांवर हल्ला चढवत तलवारीचे वार केले. हल्ल्याचा प्रकार सुरू असतानाच आरडाओरडा ऐकून बघ्यांची गर्दी जमली. काही जण भांडण सोडवण्यास गेले असता त्यांच्यावरही तलवारीने वार करण्यात आलेत. याची माहिती पोलिसपाटील सुनील पवार यांनी पोलिसांना कळविली.

पोलिसांनी बलवडीकडे धाव घेतली. तीन जखमींना विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले. 
घटनेनंतर विट्यातील ग्रामीण रुग्णालयाबाहेर बलवडी ग्रामस्थांची गर्दी केली होती. भाड्याने दिलेले शेडनेट माघारी मागितल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. त्याची फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com